रविवार, ९ जून, २०१९

पहिला पाऊस

     पाऊस पहिला
काळ्या ढगांनी भरलेअंबर
उडे पाचोळा  दाही दिशात
वारा वाहे सोसायट्याने
गडगडती मेघ  अंबरात

नाचती हर्षे मुले अंगणी
टप टप धारा बरसता अवनी
मोर दावी  नृत्य मनोहर
झेलती पक्षी थेंब, पंख पसरुनी

पडता धारा अवनी भिजली
तृप्त झाली पाणी पिऊनी
टप टप पागोळ्या पडती दारी
गंध मातीचा दरवळे दिशातूनी

जो तो जाई क्षणात भारावूनी
पहिल्या पावसाची मजाच वेगळी
वृक्ष लता वेली गेल्या तरारूनी
कांदे भज्यांची  चवच आगळी.

पाऊस  पहिला राहे स्मरणात
जून्या आठवणींना आणतो पूर
  घडले  असूनी जरी गतकाळात
आठवांनी भरुन  येतो  ऊर

वैशाली वर्तक



अष्टपैलू काव्यमंच (महिला)
अष्टपैलू काव्यमंच कला अकादमी आयोजित 
उपक्रम 78
विषय - पहिला पाऊस 

      मजाच आगळी
      
काळ्या ढगांनी भरलेअंबर
उडे पाचोळा  दाही दिशात
वारा वाहे सोसायट्याने
गडगडती मेघ  अंबरात


जो तो जाई क्षणात भारावूनी
पहिल्या पावसाची मजाच वेगळी
वृक्ष लता वेली गेल्या तरारूनी
कांदे भज्यांची  चवच आगळी

  सौ वैशाली  अविनाश वर्तक 
अहमदाबाद



 सिद्ध  साहित्यिक  समूह
उपक्रम  ४५२
- काव्य लेखन अष्टाक्षरी 
विषय - आषाढ सरी

   वर्षा ऋतू

मृग सरी बरसता     
झाली  धरा अंकुरित
तृणपाती चमकती
धरा दिसते हरित

पसरली हिरवळ
रंग धरेचा हिरवा
भासे पसरला पाचु
ऋतू  म्हणती बरवा

तृप्त झाली वसुंधरा
मेघ गर्दी नभांगणी
 सरी आषाढाच्या येता
 पाणी पाणीच अंगणी

वाजवित ढोल ताशे 
मेघ राजा बरसला
नृत्य  दावी सौदामिनी
मोर आनंदे नाचला

पाणी साचे जागोजागी
नदी वाहते  बेफाम
वृक्षलता चिंब झाल्या
 नसे सरींना  आराम

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
 सिद्ध  साहित्यिक  समूह
आयोजित  उपक्रम
विषय - पाऊस
- *वर्षा धारा*

तप्त झाली वसुंधरा
मेघ गर्दी नभांगणी
आला सोसाट्याचा वारा
पाणी बरसे अंगणी

वाजवित ढोल ताशे 
मेघ राजा बरसला
नृत्य  दावी सौदामिनी
मोर आनंदे नाचला

चिंब झाली वसुंधरा
आल्या पावसाच्या धारा
ओल्या झाल्या वृक्षवेली
गाणी गात फिरे वारा

मुले नाचती आनंदे
गात गाणी पावसाची
टपटप झेली धारा
माळ दारी  पागोळ्याची

पावसाची सर येता              
मृदगंध   पसरला 
तृप्त जाहली अवनी
मोद भरूनी उरला


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...