शुक्रवार, ७ जून, २०१९

लग्न विवाह बंधन

स्पर्धेसाठी
विषय --लग्न -विवाह --गठबंधन     5/6/2019

सहजीवनाचे  रम्य  चित्र
पाहिले मी स्वप्नातूनी
अन् माझे न मी राहिले
तुला पाहता त्या क्षणी

शुभ घडी मुहुर्तावर
साजरा करुनी लग्न सोहळा
झाले मिलन दोन जीवांचे
जमवूनी सारा गोतावळा

अग्नी ब्राह्यणाच्या साक्षीने
घातले मंगळसुत्राचे बंधन
केले माझे तुझ्यात समर्पण
आनंद घेण्या सहजीवन

अनुसरता सप्तपदी पावले
फूलले रे क्षण  माझे जीवनी
फुले वसंत संसार वेलीवरी
आनंदे   मी रंगले  क्षणोक्षणी

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...