रविवार, ९ जून, २०१९

जीवन एक संघर्ष

विषय--- जीवन एक संघर्ष

कोणास  वाटे जीवन तर,
  असे तीन अंकांचा खेळ .
कसे जगावे त्यात आनंदाने
तयाचा जमवावा लागे मेळ.

येई  कधी दुःखाला भरती,
तर कधी आनंदाची लाट.
नसे निरंतर  सदा तिमीरच,
तिमीरा नंतर प्रकाश वाट.

निसर्ग पण सहतो संघर्ष
चंद्र सूर्यास पण लागते  ग्रहण
सरिता आक्रमिते विकट वाट
अवनी करे सतत भ्रमण.

यश मिळविण्या कष्ट अपार
जन्माला येताच ,सुरु संघर्ष
स्वप्न पूर्ती , करण्या साकार
महेनतच करी जीवनी उत्कर्ष

दगडला पण,  मिळवण्या देवत्व
 सहतो , टाकीच्या घावांचा  संघर्ष
जीवन तर , आहेच  संग्राम
ध्यानी ठेवा हाच एक,  निष्कर्ष .

पहा आपले पंतप्रधानजी
लढले झेलीत अनेक संघर्ष
प्रेरणा देती  सर्व  जगाला
कसे जगावे, निष्काम सहर्ष.


वैशाली वर्तक ( अहमदाबाद )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...