शुक्रवार, ७ जून, २०१९

मानवाचे पावसास पत्र

विषयः--मानवाचे पावसास पत्र

श्रीमान वरुणराजे
  सविनय नमस्कार  विनंती विशेष.
   मी समस्त मानव जातीच्या वतीने तुजला विनंती विषयक पत्र  लिहीत आहे. कारण पण , तितकेच महत्त्वाचे  आहे. आजच जून महिन्यातची सुरुवात झाली.
सुर्याचा मृग नक्षत्रात याच महिन्यात  प्रवेश होतो. चातक पक्षी त्या मृग नक्षत्रावर पडणा-या पावसाच्या पाण्याची आतुरतेने वाट पहात असतो. तसेच आम्ही पण तितक्याच आतुरतेने  तुझ्या आगमनाची वाट पहात आहोत . तरी वेळेवर  अवनीवर येण्याची कृपा  दृष्टी ठेवावी..
      सूर्याने  ग्रीष्म ऋतुत भयंकर  दाहक किरणांनी , सर्व  वातावरण  तप्त केले आहे. मानवाच्या अंगाची  लाही लाही होत आहे. घामाच्या धारा वहात आहेत. अती गर्मीने नकोसे झाले आहे. धरणी मातेचा कण कण तप्त झाला  आहे. तिची काया नुसती रूक्ष नव्हे तर, तिच्यातील जल तत्व कमी कमी होत आहे. त्यामुळे धरेला तडे पडले आहेत. तिची तडे पडलेली काया ....भेगाळलेली काया,  जणू काही  तहानलेल्या बाळासम तोंड उघडे ठेवून  तुझ्या  पावसाच्या थेंबाची वाट पहात आहे. तिची अशी दयाजनक स्थिती  की , कित्येक  ठिकाणी तिच्यात पाण्याचा  अंश पण राहिलेला  नाही  . लवलेश उरला नाही. अशी स्थिती झाली आहे..शिवारे नुसती उघडी माळराने झाली आहेत. ती पण तुझ्या  बरसण्याची ..चिंब पाण्यात भिजण्याची वाट पहात आहेत.
      कृषीवल आकाशाकडे डोळे लावून तूझी आतुरतेने..तुझ्या पर्जन्य धारेची  वाट पहात आहेत. मानवाला पंचतत्वाची गरज आहे. त्यातील एक तत्व.. म्हणजे जल . ते तू आहेस . म्हणून तर तुला जीवन असे पण म्हणतात....संबोधतात. आणि दुखःद स्थिती ही की , तुझीच कमतरता भासत आहे.
       अरे पावसा , पर्जन्या तुजवरच सारी सृष्टी अवलंबून आहे .जल चर सृष्टी तुझ्यानेच तर जीवीत आहे. पशु , प्राणी यांना नदी नाले ओढे सुकल्याने जंगलातून
बाहेर धाव जलाशया कडे घ्यावी लागत आहे.  गुरांना तुझ्या  दुर्लभतेने पुरेसे गवत चारा .वनस्पती मिळत नाही .व मृत्यु मुखी पडण्याची वेळ येत आहे. पक्षांना पण
पाण्यासाठी जलाशय शोधावी लागत आहेत. तरी , आम्ही मानव घरोघरी पाण्याची भांडी ठेवून त्यांची सोय करतच आहोत. तरी तुझ्या  सेवेची  तुझ्या  येण्याची अत्यंत गरज आहे.
          आम्हा   मानवांची तर काय कथा सांगू ? आरे , कित्येक  गावात तर नद्या  विहीरी आटल्या सुकल्या .पिण्याचे पाणी  पण, मिळत नाही आहे. बायका मुली
उन्हाच्या कळशा , घागरी घेऊन ,कोसो अंतर चालत जाऊन ... पाण्यासाठी वण वण फिरत आहेत. कित्येक  ठिकाणी 1200/1400 फूट खणून पण पाणी मिळत हाती  लागत नाही आहे.. कित्येक  ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टेंकर 2/3 दिवसांनी पाणी पुरवून पुरवून  देत आहे.
   तुझी किंमत मानवास कळली आहे. जेथे पाणी अगदी कमी मिळते त्या लोकांच्या 
डोळ्यात पाणी येत आहे. अन्न , वस्त्र , निवारा जरी मूलभूत गरजा , तरी  तुझ्या  शिवाय जीवन अशक्य ना रे !. तरी पुन्हा  पुन्हा  विनतेय. ...तू वेळेवर लवकर ये.
नुसते आकाशी काळे ढग एकत्र करून , आम्हाला बरसण्याची आस दाखवून
वरून अवनीची मजा पहात बसू नकोस .त्या मेघांना बरसण्यास सांग.
      कृषीवल  पहा ..त्याची शिवारे नांगरून , उन्हात काबाड कष्ट करुन , घाम गाळून , जमीन कसून तयार करतोय. पीका साठी बाजारातून बी बियाणे  कर्जाने   घेउन  शेतीची तयारी करत आहे. शिवारात बी टाकेल,  पण तू जर वेळेवर बरसला तर ....त्याची ही सारी महेनत ,पैसा उपजेल. तरी तू वेळेवर ये .जेणे करुन बिया अंकुरतील .व पोशिंद्याची महेनत फळेल.
        आम्ही मानवाने काय करावे .तूच सांग आता .आम्हाला वैज्ञानिक प्रगती मागे धावण्यात  तसेच .....अती लोभाने आम्ही केलेल्या चुका  आता उमजल्या आहेत. ...वनांचा रानांचा -हास करुन आम्ही सिमेंटची जंगले तयार केलीत .
पावसाचे पाणी जमिनीत न मुरु देता सिमेंट चे रस्ते  केले .वृक्ष  कापल्याने वृक्षांची मुळे जमिनीतून पाणी शोषून... .पानातून पुन्हा  बाष्प रुपाने तुला मदत रुप होतात .त्या क्रियेत झाडे कापल्याने आम्ही  मानवांनीच तुझ्या बाष्प साठवण्याच्या क्रियेत  व्यत्यय  आणला. पण आता चूक  उमजली आहे. तशी पावले पण आम्ही मानव उचलत आहोत .प्रवासात  जातांना चिकू ,आंबा ,पपई तसेच इतर बिया घेउन त्या  रस्त्यात टाकण्याची मोहिम पण सुरु केली आहे .जेणे करुन वृक्षाची लागवण होईल. वृक्ष वाढ होईल .व पुन्हा  ही वसुंधरा हिरवी होईल.
        तरी यावर्षी वेळेवर ये.  तुझी आम्ही सारे मानव आतुरतेने वाट पहात आहोत.
पुन्हा सर्वत्र  जलाशय पाण्याने भर. व सध्या जी बिकट परिस्थिती  झाली आहे ती दूर  कर नाहीतर काही वर्षा नंतर पाण्यावरुन   युध्द  होईल. .
  तरी मानवाच्या  ह्या विनंतीस  मान देऊन योग प्रमाणात  बरस. लहान मुले पण होड्या करुन .तुझ्या  पावासाच्या पाण्यात खेळण्याची वाट पहात आहेत. टपरी वाले गरम चहा व कांदे भजीच्या गाड्या सरसावून तयार आहेत. फक्त खोळंबा आहे तो तुझा.
   तुझ्यावर अवलंबित
        मानव जात.

1 टिप्पणी:

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...