शुक्रवार, २१ जून, २०१९

वडा भात

      यामिनीने वडा भाताचा प्रोग्राम नक्की केला. व-हाडी वा आम्हा नागपूरकरांचा वडा भात फार आवडीचा .अगदी चवीने खातोत.आपण एक दिवस माझ्या कडे वडा भाताचा प्रोग्राम करु या ना .! सर्व सख्या एक सुरात म्हणाल्या होss करु की . सर्व जणी संसारातून थोड्या फार मोकळ्या झालेल्या आणि महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांच्या wave lines जुळलेल्या, त्यामुळे कुठलाही प्रोग्राम यशस्वी होतोच . ठरल्या दिवशी सा-या जणी यामिनी कडे जमल्या .तिने भात करुन ठेवला होता. मग सख्यांनी वडे तळण्यास मदत केली .यामिनीने हिंग पाणी तयार करून ठेवले होते. भात व वडे पानात कुस्करुन त्यावर फोडणीचे गरम  तेल , मीठ , चटणी , व महत्त्वाचे हिंग पाणी जे तयार केले होते .ते टाकले जेणे करून वडे बाधू नयेत . सर्वांनी आवडीने वडा भात व आजू बाजूचे पण पदार्थ खाल्ले .माझ्या मनात वडा भात खाता खाता भात व त्याचे विविध प्रकार बद्दल सहज विचार चक्र फिरू लागले खरच भारतीयांचे मुख्य धान्य गहू व भात .त्यातून भाताचे अगदी बालपणी पासूनचे म्हणजे अगदी infant अवस्थे पासून चे वा बाल्यावस्थेपासून चे नाते असते. अगदी सुरुवातीस भाताची पेज , भाताचे पाणी वा काही जण कांजीं म्हणतात . ती पण या भाताचीच असते, पुढे आपल्यात तर उष्टावण करतांना याच भाताला पहिला मान मिळतो..पुढे मऊ भात तूप वरण मीठ घालून आजी अथवा आईने कालविलेला भात खाऊन मुले गुटगुटीत होतात. त्या गुटगुटीत शब्दावरून आठविले .तो म्हणजे गुरगुट्या भात. गुरगुट्या भाताची चवच न्यारी असते. त्या भातावर साईचे दही , थोडे तूप मीठ टाकून खाणे म्हणजे आहाहा पंचपक्वान्ने त्या समोर फिकी वाटतात. त्यातून पावसाळ्यात रिमझीम ,वा झिरमीर पाऊस पडत असता गरम गुरगुट्या भात व त्यात मेतकूट लिंबू मीठ म्हणजे तर अप्रतिम तसेच पचनास पण हलका . साऊथ कडे गेलो की भात तर त्यांचे मुख्य अन्न .रसम् सापड्म , लेमन भात , टाॕमेटो भात , किती तरी प्रकार आढळतात. ऐवढेच काय कालचा राहिलेला भात दुस-या दिवशी जीरे , हींग , कढीपत्ता ,उडीद डाळ व त्यात कांदा टाॕमेटो टाकून फोडणीचा भात तर सकाळी न्याहरीची मजा वाढवितो. नारळी पौर्णिमेचा नारळी भात , तसेच केशर भात , पाईनेपल भात , वगैरे गोड भाताचे प्रकार पण आवडीचे असतात . पंक्तीत तर मसाले भात बरोबर बाजूला केसर भाताची मुद जेवणाची लज्जत वाढवित असते. तसेच चित्रांन (भाताचाच प्रकार ) चण्याची डाळ भिजवून , शेंगदाणे टाकून केलेला चित्रांन भात फार रुजकर लागतो. कर्नाटकातील बुत्ती भात प्रसिध्द आहेच .कित्येक ठिकाणी कर्नाटकात रेल्वे स्टेशनवर पण केळ्याच्या पूडीत बांधून मिळतो. प्रवासा जातांना मऊ भातात भरपूरदूध घालून उगीच विरजणा पुरते दही घालून तूप जी-याची हींग उडीद डाळ लाल सुकी वा सांडगी मिरची फोडणीस टाकून कालविलेला भात फारच रुचकर तर लागतोच पण प्रवासातील अबर जबर येत असालेले खाल्ला वर हा भात पोटाला व मनाला थंडक पोहाचवतो. उत्तर प्रदेशात लांब सडक सुगंधी बासमती भाताचा पुलाव सर्व देशभर प्रसिध्द आहेच. त्याचे पण किती तरी प्रकार आहेत .तसेच ओले वाटाणे भात , बिरयाणी जीरा भात हे सारे भाताचे प्रकार प्रचलित आहेतच. सध्या जसे पहेरवेशात बदल होत चालला आहे तसेच खाद्य पदार्थाचे पण अनुकरण होत आहे .चाईनीज फूड जसे लोक प्रिय होत गेले .तसे शेजवान राईस पण फार प्रचलित झाला आहे. लाल चुटूक शेजवान राईस मंचुरियन बरोबर मुले आवडीने खातात.त्यांना घरचे पदार्थ तिखट लागतात. ते चालत नाही. पण तो तिखट शेजवान भात आवडीने खातात. तर असे आजून पण अनेक भाताचे प्रकार माझ्या मनात डोकावून गेलेत. व अजूनही प्रकार आहेत .तेव्हा थोडक्यात काय खाणा-यांना काय बहाणा पाहिजे. तेव्हा वडा भात खायला घालणा-या यामिनीचे व नागपूरच्या वडा भाताचे शतदा आभार की ज्याने येवढी विचार मालिका दिली. Sent from Yahoo Mail on Android

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...