माझी लेखणी
दिलेल्या मुद्यावर लेखन
गरज सरो वैद्य मरो
*स्वार्थी स्वभाव*
मानवाच्या स्वभावात
ळ काही असती स्वार्थी ळ
स्वभावास नाही औषध
तर काहीअसती निस्वार्थी
रोज होणा-या वर्तनात
कळु लागतो स्वभाव
हळु हळु टाळतो तया
वाटे नको त्याचा सहवास
काही जन बोलती गोड
काढून घेती आपले काम
काम होता जाती विसरून
कोण कुठले ,[कुठले धाम
अशा जनांची वृत्ती असे
गरज सरो वैद्य मरो
काम आपले होता साध्य
तुमची किंमत भले शुन्य ठरो
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा