काव्य स्पंदन राज्यस्तरीय स्पर्धा 02
काव्यलेखन स्पर्धा
प्रकार अष्टाक्षरी
विषय माया
शीर्षक... मायेची पखरण
माया असते आईची
कधी न होता आबाळ
अहोरात्र तिज चिंता
सुखी राहो तिचा बाळ.
आभाळाची विशालता
कशी करावी मोजणी
भाव मातेचे मायेचे
नसे शब्दात मांडणी
माता पशू वा पक्ष्यांची
माया ती आभाळभर
जरी ,गगनी भरारी
लक्ष मायेचे पिलावर
गुरू शिष्याची माया ही
असतेच मनी खास
शिष्य पार्थास. कृष्णाने
विश्वरूप दावी खास!.
माया अगाघ देवाची
किती वर्णावी महती
काळ संपे जीवनाचा
शब्द तोकडे भासती.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा