मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२६

वृत बध्द अनलज्वाला.

अनलज्वाला ८-८-८


विजयी होण्या ,  कष्ट जरूरी,  ऐकत  आलो
तू कधी मना,  नको  डगमगू  पटवत आलो

तिमीर  सरता. येते ऊषा, जाणत होतो
रोजच्यारोज,   नवा उपक्रम   रुजवत  आलो

दिवस सुखाचे, लवकर यावे.अपेक्षा मनी
मेहनतीच्या, बळावर मना  , फुलवत आलो  

 तसे पहाता, होता अंगी, आळस माझ्या  
काळाने मज  देता अद्ल  उमजत आलो

मिळवित जाता  जीवनात यश, हर्षित झालो
सारे मिळते करीता कष्ट ठरवत आलो


 दूर सारुनी  मोह पाश ते  नाचत आलो
विजय चषक हा  मिळता  हर्षे  मिरवत आलो

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्या मुद्यावरून कविता

दिल्या मुद्यावरून कविता  यायची पाणी नेण्यास रोज  एक सुंदर तरुण नार  असेच एका दिवशी अवचित   दृष्टीस पडला एक सुकुमार होई नियमित नजरा नजर  काम ...