मोहरली लेखणी साहित्य समूह
उपक्रम
विषय आपली माणसे
वृत्त व्दियोध्द
शीर्षक. आपलेपण
म्हणता आपली
का अशी? वागली
आपले पण कुठे
आज ती विसरली
आपली माणसे
पाहता फायदा
काढती सवडही
करितसे वायदा
पाहता संकटे.
दूरची धावली
जी पुढे ती खरी
समजणे आपली
देखणी वाटती
चांगले बोलती.
वेळ नाही असे
सहजची सांगती
सद्य काळी जरा
माणसे पारखा
कोणता आपला
ओळखा तो सखा
संपला या जगी
(आपलेपण) नेहमी. मानवा नेहमी
माणसाची सदा
कोण देतो हमी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा