बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

एकटा

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 
उपक्रम 
विषय एकटा

का ? शब्दची एकटा 
वाटे नकोसा मनाला 
खर पहाता आलोय
एकटेच ना! जन्माला 

पण येताची  जन्मास
सुरू होतो गोतावळा
माय -बाप भाऊ- बहिण 
 मिळता, हर्षाचा सोहळा

 मानव सामाजिक प्राणी
एकमेका देत साथ
नावडे एकटे रहाणे
!सुख दुःखात मिळतो हात

सारे असता सभोवती
विरंगुळा वाटे मना
एकटेच असता मात्र 
 कसे जगावे वाटे  क्षणा

 तरी कधीतरी वाटते 
 बसावे जरा एकांती
 शांत बसूनी रहावे
 मिळवावी मना विश्रांती 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हरवतो वर्तमान काळ

मौहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  उपक्रम क्रमांक १६५१ दि२८\१०\२६ आपण कोणीच आजकाल आताच्या काळात जगू शकत नाही, भविष्याची चिंता किंवा किंवा स्व...