सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

सौजन्य

स्पर्धेसाठी 

कमल विश्व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित 
मासिक काव्य लेखन स्पर्धा 
विषय ... सौजन्य 

सौजन्य गुण स्वभावाचा,
प्रत्येकाच्या बालपणी.
जशी होते,जडण-घडण
तसे सौजन्य दिसे जीवनी.

सौजन्य उजळे मानवास,
मिळे शाबासकी सदाची.
होते वाहsवा समाजात,
सौजन्यशील माणसाची.

मायबापांचे संस्कार,
हीच पाळेमुळे सौजन्याची.
रचतात पाया गुणांचा,
जी ठरतात महत्त्वाची.

वाणीने जिंकता जग,
वागण्यात आदर भाव
सौजन्यशील माणसावर,
होई प्रेमाचा वर्षाव

अमूल्य गुणांचा ठेवा.  
सौजन्यानेच सजतो
नाही मिळत कधी पैशाने
स्वभावातून दिसतो

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सौजन्य

स्पर्धेसाठी  कमल विश्व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित  मासिक काव्य लेखन स्पर्धा  विषय ... सौजन्य  सौजन्य गुण स्वभावाचा, प्रत्येकाच्या बालपणी. जश...