रविवार, १९ जुलै, २०२६

किंवा किंव्हा अथवा

किंवा \ किंव्हा

 किंवा शब्दच असा की
 देतो आपणा पर्याय
 आवडीचे ते घेण्यास
 सांगे सहज  उपाय.

सुरू काळ शिक्षणाचा
परीक्षेच्या पेपरात
देती विकल्प प्रश्नास
किंवा दिसे प्रामुख्यात

छंद असती अनेक 
निवडती आवडीने
तेथे पर्याय असती
 स्विकारण्या  ते स्वेच्छेने 

किंवा,  वा , अथवा , आहे
शब्द सारेची   आगळे
कोणताही उचलावा
नाही अर्थात  वेगळे .

जिंकू वा मरू पर्याय 
असे सदा सैनिकांना
स्वदेशाच्या रक्षणार्थ 
उभा रही बलिदाना

 घडविता भवितव्य
 तया  महत्व  जीवनाते
 पडे प्रश्नची मनास
 कठीण निवडण्याते.

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रिकाम्या हाताची श्रीमंती

 रिकाम्या हाताची श्रीमंती  20/7/26 आपण रिक्तची हस्ते जाणार ही रिकाम्या हाती कमवावी मनाची श्रीमंती सुबोध  हा संतची. सांगताती हात दिधले स...