काव्य स्पंदन राज्यस्तरीय 2
आयोजित झटपट काव्य लेखन स्पर्धा 2
विषय पाटाचे पाणी
शीर्षक शिवारी स्थान निवांताचे
देश आपला कृषी प्रधान
करावी लागते सोय जलाची
कृषिवलाच्या जीवनात गरज
सदैव पाटाच्या पाण्याची .
शिवारातून वहात असते
झुळूझुळू पाटाचे पाणी
त्याचा आवाज भासे
जणु गाई मंजुळ गाणी
वहात्या पाण्यावर पाटाच्या
दुपारी जेवण कांदा भाकरीचे
घरून धरधणी आणते
मनी कसे संतोषाने विश्रामाचे
थंड मंद वाहे पाणी
पक्षी पण घेती आनंद
सकाळी पाण्यासाठी येता
खेळ त्याचा पहाण्याचा लागे छंद.
पाटाच्या पाण्यावर पहा
किती मन रमते
पाणी देते मना ऊर्जा
वहाते पाणी पहाणे गमते
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा