शनिवार, ४ जुलै, २०२६

हसरी सकाळ

विश्व लेखकां


विश्व लेखकांचे 
आयोजित काव्यलेखन 
दिलेल्या विषया वर 
विषय.  हसरी सकाळ 


ऐकू आली किलबिल
भासे झालीय सकाळ 
रवी राजे येता नभी
झाली पहा  उष:काळ

प्राची हळु उजळली
रवी   किरणे फाकली
सडे केशराचे नभी
उषा लाजत हासली.

 थंड मंद पवनाने 
दिशा जाहल्या गंधित 
फुले फुलली मोहक 
मन जाहले मोहित

 केली दूर मरगळ
उषा देते मना आशा 
उठ मानवा प्रभाती 
दूर सारूनी निराशा

मंद स्वर कानी आले
गोड ऐकता भुपाळी 
मंगल मय नाव मुखी
 भासे सुखद सकाळी 

रोज. येऊनी गगनी
दिनकर करी उषा
करी  हसरी प्रभात
उजळती दशदिशा

 वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सकाळ विषयक. हसरी सकाळ स्वाक्षरी सोनेरी पहाट उध्दव वृत्त

विषय.  हसरी सकाळ  ऐकू आली किलबिल भासे झालीय सकाळ  रवी राजे येता नभी झाली पहा  उष:काळ प्राची हळु उजळली रवी   किरणे फाकली सडे केशराचे नभी उषा ...