शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

आजही आठवतो एकेक शब्द

 आजही आठवतो एकेक शब्द



दिले संस्कार  आईबाबांनी

आपणास  जे बालपणी

अजूनी आठवितात शब्द-शब्द

  ध्यानी रहाते शिकवण मनी


माती सम गोळ्याला जयांनी

बनूनी उत्तम  शिल्पकार

घडविले सर्वोत्तम  शिल्प

ध्यानी  तयांचे उपकार


दिली  घेतलेली  वचन

घेऊनी हात हाती विश्वासाने

शब्द न् शब्द अजूनी स्मरते

पूर्ण  केलीत दोघांनी सहर्षाने


 शब्द मातेचा ठेविला जपूनी

 करिता गृहप्रवेश सासरी

लाभले सुखद सहजीवन

भरल्या प्रेमाच्या घागरी



वैशाली वर्तक 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आजही आठवतो एकेक शब्द

 आजही आठवतो एकेक शब्द दिले संस्कार  आईबाबांनी आपणास  जे बालपणी अजूनी आठवितात शब्द-शब्द   ध्यानी रहाते शिकवण मनी माती सम गोळ्याला जयांनी बनून...