शुक्रवार, १३ मार्च, २०२६

गझल. ... आनंद कंद

 झरणी अशी फुलावी   माझ्यात जाण आली

 स्मरता गुरू विजोंना, काव्यात जाण आली


देऊन बोध मजला, केले अता  लिहीते

घेताच कष्ट थोडे, तंत्रात जाण आली.


रागे भरे न होता, केले मला शहाणे

आता करीन लेखन,  तर्कात जाण आली.


घेऊन रोज शाळा, होतील गझलकारा

आहेच नाव त्यांचे, हर्षात जाण आली


वंदून शारदेला,  नमितेय मी  सरांना

मदतीस हात लाभो ,    गझलेत    जाण आली. 


वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाऊलखुणा

असतात उपयोगी जीवनी पाऊलखुणा प्रत्येकास फार तिच्या मुळे  लागतो ठाव भुतकाळाचा  वारंवार   चालताना वाटसरू  टाकत असतो पाऊल मागच्या  वाटसरूला मिळे...