फक्त वृत्त बध्द कविता उपक्रमा साठी
आशय ओळी विजोंच्या
वृत्त चंद्रकांत/पतितपावन
8-8-8-2
शीर्षक. ...मंनिषा
अशी दिवाळी, एके वेळीं,करित होतो कदा
सारे जाता, परदेशाला, नुरली मजा सदा
चार दिवस घर, गजबजलेले, गप्पात रंगती
काका काकू, आत्या मामा, आप्तेष्ती
रोजच नवीन मिरवित कपडे तयार होती जन
आनंदाला उधाण येई व्यक्त कसे करु मन
पोरे रमली, देश सोडला, घर ओके पडले
ज्येष्ठच आता एक एकटे , घरोघरी उरले.
आता उरल्या गत काळाच्या आठवणी मनी
फिरून यावे, आपुल्या देशा, ही शुभेच्छा मनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा