शब्दगंध सिंगापूर 7/10/24
भान
प्रसंग, घटना ,अस्तित्वाची
मानवाच्या चित्ताची जाण
वा, तयाच्या अंतर्मनातील
एक जाणीव, ते असे भान
जाण, लक्ष , ध्यान सारेची
दाखवीती चित्ताचे भान
मन असता एकाग्र कामात
मानव विसरे देहभान
रोजच्या दैनंदिन जीवनात
वागताना जरूरी असे भान
आपापली कर्तव्ये समजून
वागावे , न होता बेभान
मराठी भाषेला मिळालाय
दर्जा अभिजात, ठेवून ती जाण
मराठी बोलून वाचून लिहून
भाषेचे जतन करण्याचे राखू भान
भक्तीत लीन मीराबाई
विसरूनिया देहभान
विसर पडे काळ वेळेचा
भक्तीरसात सदा रममाण.
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा