सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित स्पर्धा
स्पर्धा क्रमांक 1
काव्यप्रकार पारंपारिक
विषय. ... प्रेमातील गोडवा
शीर्षक...प्रेम भावना
प्रेमच असे उत्कट भावना
कसे करु तिचे गुणगान
होत नाही कधी किंमत प्रेमाची
प्रेम देई मनाला समाधान
अंतरी वाटे सदैव एकभाव
प्रेमात नसे कधी मी तू पण
जणु असूनी दोन जीव
वसती, जैसे एकच आपण
*प्रेमाचा गोडवा* दावी आपुलकी
स्वार्थी भावाचा असे अभाव.
दिसे सर्वस्वाचा त्याग
नसे आप मतलब ठाव
आपुलकीची भावना मनी
प्रेमात दिसे सदैव तत्पर
करुणा, दयेचे, प्रेमळ झरे
वहाताती सदैव निरंतर
जशी नदी साहूनी कडे-कपारी
येता धावत नसे खंत
तिच भावना एकमेकासाठी
कष्ट करण्यात नसे उसंत
असा प्रेमाचा गोडवा
वसे प्रेम चराचरात
देई आनंद भरभरूनी
भरलेले प्रेम चराचरात
वैशाली वर्तक .
अहमदाबाद .
8141427430
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा