विश्व लेखकांचे
आयोजित उपक्रम
षडाक्षरी काव्य लेखन
विषय .. सोनेरी पहाट
शशी मावळला
मंदावले तारे
थंड ती लहर
झोंबे अंगा वारे
झाली झुंज मुंज
प्राची उजळली
रवीची किरणे
नभी पसरली
केशराचे सडे
सोनेरी पहाट
पक्षी करितात
तो किलबिलाट
दरवळे गंध
सुमने फुलली
सोनेरी पहाट
मंडळी जाहली.
वैशाली वर्तक
अहमदाबाद*स्पर्धेसाठी*
अभामसाप धुळे जिल्हा
सहाक्षरी. काव्यरचना
विषय ... माहेर
*आवडीचे स्थान*
शब्दची माहेर
करी आठवण
उभे डोळ्यापुढे
सारे बालपण.
प्रेमाचा तो हात
भासे अंगावरी
आईचा फिरला
पहा क्षणभरी
क्षणोक्षणी सय
आजीची ती माया
मनात दडली
ममतेची छाया
दिन ते मौजेचे
ओढ सदैवाची
मनी लागलेली
आस माहेराची
लेक सोडूनिया
स्वतःचे माहेर
जणु सासराला
असे तो आहेर
खुशाली कळता
जीव आनंदतो
तरी भेटीसाठी
सदा आतुरतो.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा