बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

खरा स्वर्ग


मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र 
स्पर्धात्मक उपक्रम क्रमांक 23
विषय   खरा स्वर्ग 

     *क्षण  स्वर्ग सुखाचे*

क्षण स्वर्ग सुखाचे शोधावे
भरलेल्या याची  जीवनाते
आनंदाने सदा जगता
बहरतील ते क्षणाते.

पहा ,ऊषा उजळली
घेत नव्या आशेचा  साज
क्षण , सुखाचे वेचावे
आनंदाचा लावूनी ताज.

 होता मना सारखे वाटे
स्वर्ग सुख लाभते मनी 
 उपभोग घेता  त्यासुखाचा 
मनी समाधान वाटे त्याक्षणी


ऊषे नंतर येता निशा
टिपूर चांदणे मोहविते मना
लुटा अनामिक आनंद 
वाटते, स्वर्ग सुख त्या क्षणा.


भरले हे जग मोदाने
नको  उदासिनता मनात
मोद विहरतो चोहीकडे
 मिळतात सुखाचे क्षण-क्षणात.


कृपा दृष्टीही देवाची
असतेच पहा सदा साठी
नाही भासते उणीव
हरी उभा  असता सदापाठी


भाग्यवान  मी मानीते
वाहे आनंद  सरिता
 स्वर्ग सौख्य लाभे मजला
सांगे ही मम कविता

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...