साहित्य दर्पण कला मंच आयोजित उपक्रम क्रमांक ३१४
१२\१२\२४
विषय मैत्री विज्ञानाशी
प्रकार ... अभंग
भौतिक सुखाची. |आहेना कामना |
करा आराधना. | विज्ञानाची ||. १
विज्ञानाने झाली. | सुलभता कामी. |
युक्ती शोधली नाही | सदा साठी ||. २
कष्ट वाचविते | विज्ञान प्रगती |
आहेच महती. | विज्ञानाची ||. ३
होते बरसात | सुखी जीवनाची |
मैत्री विज्ञानाची |. करा सदा ||. ४
विज्ञानाने झाले | सुलभ जीवन |
आनंदिले मन |. मानवाचे. ||. ५
विज्ञाना संगती | शास्त्रज्ञांचे ज्ञान |
दक्षतेची जाण. | वाढे सदा. ||. ६
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा