सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६
सौजन्य
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६
चित्र काव्य
गोड गैरसमज
गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६
हायकू. तुझे हासणे
बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६
प्रत्येकाची कहाणी
जागतिक कला साहित्य व्यक्तित्व विकास मंच*
*सलमान दादा शेख यांचे वाढदिवसा प्रित्यर्थ*
*आयोजित स्पर्धेसाठी कविता*
*स्पर्धा क्रं. 94*
*दि. 18.08.2026*
*विषय : प्रत्येकाची एक कहाणी*
शीर्षक. मी कोण
मी कोण असे पुसता
प्रश्न ..अस्तित्व,वा स्व ओळखीचा
मी,आहे तुमच्यातील सारस्वत
छंद जडलाय लेखणीचा
आहेत साहित्य समूह अनेक
जतन करण्या मायबोली
देत-घेत विचारांना चालना
रचिते रोज चार ओळी
होते खरी तरणपटू,... बेंकर
निवृत्तीत छंद जडला लेखणीचा
अन् अविभाज्य स्थान तिज लाभता
मान मिळाला कवियित्रीचा.
कोणी म्हणे मी अशी मी तशी
बोला , बोला तुम्ही काही
माझ्यात मात्र फरक तसुभर
कधीही पडणार नाही
नेहमीच वाटते जनांना
आहेची मी थोडी शिष्ट
पण ,खरच सांगते तुम्हा
नाहीचय, मी गर्विष्ठ
रहाते रममाण माझी मी
सदा माझ्याची छंदात
अन् मिळतो परमानंद
मला दिवस भरात
आहेच हं , मात्र मी मनाने.
अतिशय स्वाभिमानी
माझ्या जीवनातील काळात
खरोखरी समाधानी
लागलाय छंद लेखनाचा
सेवा निवृत्त जीवनी
तोची असे माझा विरंगुळा
. हीच माझी कहाणी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
8141427430
मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६
चित्र काव्य
झटुनिया करू यत्न
टाकुया प्रगतीचे पाऊल
उजळवू ज्ञान ज्योती
लागेल यशाची चाहुल
साथ देत एकमेकांस
चला जाऊया शिखरी
ज्ञान दीप उजळविण्याची
आस हवीच अंतरी.
खचू नका ,भिऊ नका
असेच सदाची जायचे
शेताची कितीही संकटे
क्षणभर न डगमगायचे.
मनी करिता निश्चय
यश मेरू येईल समीप
जुळता वात ज्ञानाची
देईल प्रकाश ज्ञान दीप
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६
प्रतिलिपी चे विचार साहित्य अज्ञात वारसदार
आभाळाला स्पर्शताना
#################.
असो आभाळ उत्तुंग
मन देत असता उभारी.
आशा मनात यशाची.
घ्यावी बिनधास्त भरारी.
करा बळ एकवटून यत्न
असता आपण बलवंत
मनच देते वेळोवेळी ग्वाही
होणार आपण यशवंत
होता अपेक्षा पूर्तता
आभाळाला स्पर्शण्याचा
होईल मनी आभास
क्षण असेल आनंदाचा
काळाच्या पुढच पाऊल
###################
घेणे उद्याचा अंदाज
असे गोष्ट योग्यच
जेणे करून जीवन
जगण्या होतो सुसज्ज
जग झालय प्रगतीशील
आयोजन चाले भविष्याचे
जगता वर्तमान काळात
जेणे करुन जगणं होते आनंदाचे.
काळाच्या पुढच पाऊल
टाकावी लागतात सदा
तहान लागता विहीर खणणे
नसेची योग्य कदा
साधी मुंगी किटक पहा
करत असते काम अविरत
पाऊस पडला तरी त्यांचे
कोठार भरलेलं सदोदित
वैशाली वर्तक
##################
पुस्तका बाहेरील ज्ञान
खरं आहे ,झालो आपण पदवीधर
पण किती कामास येते ज्ञान जीवनभर
बहिणाबाईंना नव्हते पुस्तकी ज्ञान
पण ख-या ज्ञानाची दिधली जगाला जाण
आमच्या आजीला नव्हते ज्ञान पुस्तकी
पण अचूक वेळ सांगायची आम्हा नेमकी
बाळ संस्कार देऊन घडविले जीवनी
षडरिपूं पासून दूर रहा बिंबविले मनी.
अनुभव पण हे सारे शिकवे आपणास
अनुभवाचे गाठोडे येते कामास
###############################
*अज्ञात वारसदार*
अज्ञात वारसदार
वेळ अशी आहे की
कोणी असो. रंक वा राजा
वेळ विकत नाही मिळत
किती ही करा गाजा वाजा
जितके नक्की असतात
त्याचे ठरलेले श्वास
पूर्ण होता जीवनी
सोडून जातो हमखास
##########################
चेहऱ्याविना माणूस
चेहरा सांगतो गुज मनीचे
दिसे सौंदर्य चेह-या ने
नेत्र त्यावरील दावी सृष्टी
संवाद मुखातून वाणीने
चेहऱ्यात महत्वाचा
वसलाय मेंदू देहराजा
तोच कर्ता या धडाचा
त्याचा शरीरी गाजावाजा
असे असता चेहऱ्यास
सर्वोपरी अती महत्व
चेहऱ्याविना माणसाचे
सांगा कसे टिकणार अस्तित्व.
######################
कथा. बाप्पा आले धावून
साकव्य कथा स्पर्धा २ साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित सन्माननीय डॉ दाखवायची पंडित, विद्या प्रधान,परवीन कौसर आणि सन्मा. समूह सदस्य दत...
-
छबी सांगते कानात कर काव्य तीजवर राहिले गत वर्षात आहे मात्र खरोखर लेखणी वदे मजला काय मी लिहीणार हीच तर कवयित्री मी काय विशेष स्फु...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
समजून घे तू सुखी जीवन जगण्या स्वभावही हवी तडजोड समजूनी घेता एकमेका जीवन आंब्याची फोड नको आपलाच हेका ऐका दुसऱ्यांचे पण ठरत...

