शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

सकाळ विषयक. हसरी सकाळ सहाक्षरी सोनेरी पहाट उध्दव वृत्त

विषय.  हसरी सकाळ 


ऐकू आली किलबिल
भासे झालीय सकाळ 
रवी राजे येता नभी
झाली पहा  उष:काळ

प्राची हळु उजळली
रवी   किरणे फाकली
सडे केशराचे नभी
उषा लाजत हासली.

 थंड मंद पवनाने 
दिशा जाहल्या गंधित 
फुले फुलली मोहक 
मन जाहले मोहित

 केली दूर मरगळ
उषा देते मना आशा 
उठ मानवा प्रभाती 
दूर सारूनी निराशा

मंद स्वर कानी आले
गोड ऐकता भुपाळी 
मंगल मय नाव मुखी
 भासे सुखद सकाळी 

रोज. येऊनी गगनी
दिनकर करी उषा
करी  हसरी प्रभात
उजळती दशदिशा

 वैशाली वर्तक 
 अहमदाबाद


*षडाक्षरी काव्य लेखन*
विषय .. सोनेरी पहाट 


शशी मावळला
मंदावले तारे
थंड  ती लहर
झोंबे अंगा वारे


झाली झुंज मुंज 
 प्राची उजळली
रवीची किरणे 
नभी पसरली

केशराचे सडे
सोनेरी पहाट
पक्षी करितात
तो  किलबिलाट 


दरवळे गंध
सुमने फुलली
सोनेरी पहाट 
मंडळी जाहली.

वैशाली वर्तक 


वृत्तबद्ध उध्दव 
विषय... पहाट 

तम निशेचा पहा सरता
खग नभात उडती  सारी   
किलबिलाट भासे सुंदर 
उठ ,प्रातः झाली न्यारी

पूर्व दिशा पहा उजळली
शीत मंद वाहे वारा
सुमनांचा गंध दरवळे
शुभ भासे परिसर  सारा

घर रांगोळीने सजले
स्वर भुपाळीचे कानी
प्रातः वेळी ऐकू  येते.   
सुमधुर स्वरांची गाणी

आशा रुपी कळ्या फुलती
होता रवीचे आगमन
दूर दूर होई   मरगळ
मनाने आनंदती जन

क्षण आनंदाचे भासे
नव आशा येती ध्यानी 
रामाचा गजर अंतरी
 भजन धून येते कानी              

वैशाली वर्तक

गुरुवार, ३० जुलै, २०२६

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

सिद्ध साहित्य‌‌‌क समूह आयोजित 
पत्र लेखन स्वरुपात कविता 
विषय ...या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे 



पत्राद्वारे तुजला पुसते
का मनात उगाच निराशा
बघ आला सूर्य नभात 
घेऊन सर्वांसाठी नव आशा

  शुक्र तारा घन घोर तिमीरी
तेजाळे पहा सदेव कसा
फुल कोमेजता फळ डोलते
मधुर स्वाद मिळतो असा

 सुंदर  आहेची  हे जीवन
देवे दिधलेल्या या जन्मावर 
सहर्ष करिता स्वागत
 लाव सार्थकी तू  जन्मभर 


आजचा सारा हा खटाटोप 
  मी केला.हेच सांगण्या
प्राप्त काळ असे मनोहर
कर मन आनंदी जगण्या

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २७ जुलै, २०२६

झाले गेले विसरून जावे

जगाचा पोशिंदा साहित्य समूह आयोजित 
काव्यलेखन उपक्रम 
दि २७\७\२६
विषय ...झाले गेले विसरून जावे
शीर्षक..


झाले गेले होऊन गेले
नको मनी तयांच्या साठवणी
जगुया  दिन आजचा आनंदाने 
कालच्या दुःखाची नको उजळणी.

करा मनाची स्वच्छ पाटी
जाणा मोठ्या मनाची महती,
कोणी दिले  , कोणी नाही 
याची विसरा आता गणती.

नका करु मन संकुचित 
मिळता कधी चिमूटभर ,
मन हवे सदा समाधानी
मिळेल उद्याला मुठभर

कालची गोष्ट आज विसरा
नव्याने उजळली, ऊषा आता
दावील ती नव्या दिशा
कशास हव्या कालच्या बाता.

झाले गेले गंगेला मिळाले 
असे वदती वडील धारी 
आहे तेची खरे जीवनी
सुबोध त्यांचा असेची  भारी

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद 
८१४१४२७४३०


.

रविवार, २६ जुलै, २०२६

आठोळी रचना. लक्षवेधी साखर भग्नावशेष चहा आणि पाऊस


लक्षवेधी 
काही असतात लक्षवेधी 
स्वतःचे अस्तित्व दाखविण्या
दाखवितात चुणुक बुद्धीची
लक्ष आपल्या कडे वेधण्या

अर्जून होताच लक्षवेधी
परिक्षेत दिधले उत्तर 
दिसे मजला फक्त डोळाच
द्रोणाचार्य जाहले निरुत्तर

*स्पर्धेसाठी*

माझी लेखणी साहित्य मंच 
8/8/26
विषय.   साखर


नको मिथ्याभिमान मनी
वाणीत हवी *साखर* थोडी
सहकाराची भावना मनी
कोण करेल उगा कुरघोडी

महत्व आहेच साखरेचे 
शुभ वार्ता ऐकता  येतेच सय
 तोंड गोड केल्याशिवाय 
   चालत नाही हयगय
 
वैशाली वर्तक 

विकास 

जेव्हा देश नव्हता विकसित 
सरकार राबवी आयोजन
जेणे करून देशाचा विकास 
करण्याचे असे प्रयोजन

आता  आपल्या देशाचा
विकास  पहा सर्व क्षेत्रांत 
अंतराळात  झालाय  प्रगत
अभिमान आहे त्याच्या विकासात





भग्नावशेष 
शीर्षक..जपणुक संस्कृती 

उत्खलनात  मिळतात 
भग्नावशेष अनेक मूर्ती 
ज्यामुळे  सहज कळते
त्याकाळची संस्कृती 

पुरातन वस्तू संशोधन 
यांचा असतो हाच ध्यास 
करिते नेमकं हेच काम 
  शोधून काढणे  जुना इतिहास 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद


उपक्रम आठोळी
विषय - चहा आणि पाऊस

आकाशातील ढगांना
झाली  बरसण्याची घाई
लगेच शब्द येती कानी
चला चहा टाका ताई माई


रिमझिम पडतोय पाऊस
गरम चहा ची वेगळी लज्जत 
घोट घोट गरम पिता चहा
 पावसाच्या थेंबाची पहा गंम्मत

वैशाली वर्तक
 

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

जुगलबंदी

काव्य निनाद  राष्ट्रीय साहित्य मंच पुणे 
काव्यलेखन उपक्रम 
विषय .. जुगलबंदी 
शीर्षक.... सादरीकरण 

वदता शब्द जुगलबंदी 
येई विचार मनात 
चाले  ही क्षणा क्षणाला 
रोजच्या जीवनात 

दुजा अर्थ असे स्पर्धा 
दिसते ती ,हर क्षेत्रात 
 खेळ,गायन, वादन, वा 
 साहित्याच्या लेखनात 

संभाषण राही, सुसंवाद 
भासे  सुरळीत   सदा
स्वतःचा प्रस्ताव  पटविण्या. 
शाब्दिक जुगलबंदी होते कदा

  गायनात दिसे जुगलबंदी 
दोन वाद्य कलाकारांची
श्रोते गण होती खुश 
मिळे थाप कौतुकाची

  जुगलबंदी दावी चुळुक
  आत्मसात केलेल्या गुणांची 
  जीवनात हवी हवीशी वाटे
   स्फुर्तीने  लहर  येते आनंदाची

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, २२ जुलै, २०२६

कसे जमते तुज सारे

काव्य निनाद राष्ट्रीय साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम 
दि 22/7/26
विषय .. कसे जमते तुला
शीर्षक.. हिशोबनीश

कसे तुजला जमते रे
तु‌च आम्हाला आधार
सारी सृष्टी  विसंबित तुजवरी
 संभाळीतो जगताचा भार


तुझ्या अस्तित्वाचा खेळ
आहे या जगी न्यारा
तूची घडविशी तोडीशी
जगातील पसारा सारा



तूची दिले सुंदर  आकाश
निर्मीले सूर्य चंद्र तारे
तव कृपा प्रसादे घडती ऋतु
तुझ्या विना कुठले आनंद वारे  


कसे राहे आठवणीत तव
संचित कर्म मानवाचे
घडविशी अमुचे  आयुष्य 
दावीत  दिन सुख दुःखाचे

घडविशी रोज सकाळ 
कालचक्र उषा अन् निशा
चाले खेळ सुख दुःखाचा
रोज नव्याने देतो दिशा


अंत समयी येती शब्द 
तुची खरा हिशोबनीश
जाणती तव अस्तित्व 
म्हणती तुजला जगदीश

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

सोमवार, २० जुलै, २०२६

रिकाम्या हाताची श्रीमंती

 रिकाम्या हाताची श्रीमंती 

20/7/26


आपण रिक्तची हस्ते
जाणार ही रिकाम्या हाती
कमवावी मनाची श्रीमंती
सुबोध  हा संतची. सांगताती

हात दिधले सत्कर्म कराया
नाही फक्त  शोभवाया आभुषणे
दान धर्मे दीन पतिता उठवावे
हेच बिंबवावे सदा मने

यातच दडलेली असे

रिकाम्या हाताची  श्रीमंती
हाच मंत्र ठेवा ध्यानी
हीच शिकवण  देते  आपली संस्कृती 

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...