बुधवार, २२ जुलै, २०२६

कसे जमते तुज सारे

काव्य निनाद राष्ट्रीय साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम 
दि 22/7/26
विषय .. कसे जमते तुला
शीर्षक.. हिशोबनीश

कसे तुजला जमते रे
तु‌च आम्हाला आधार
सारी सृष्टी  विसंबित तुजवरी
 संभाळीतो जगताचा भार


तुझ्या अस्तित्वाचा खेळ
आहे या जगी न्यारा
तूची घडविशी तोडीशी
जगातील पसारा सारा



तूची दिले सुंदर  आकाश
निर्मीले सूर्य चंद्र तारे
तव कृपा प्रसादे घडती ऋतु
तुझ्या विना कुठले आनंद वारे  


कसे राहे आठवणीत तव
संचित कर्म मानवाचे
घडविशी अमुचे  आयुष्य 
दावीत  दिन सुख दुःखाचे

घडविशी रोज सकाळ 
कालचक्र उषा अन् निशा
चाले खेळ सुख दुःखाचा
रोज नव्याने देतो दिशा


अंत समयी येती शब्द 
तुची खरा हिशोबनीश
जाणती तव अस्तित्व 
म्हणती तुजला जगदीश

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एकटा

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  उपक्रम  विषय एकटा का ? शब्दची एकटा  वाटे नकोसा मनाला  खर पहाता आलोय एकटेच ना! जन्माला  पण येताची  जन्मास स...