गुरुवार, १७ जुलै, २०२५

कल्पना विस्तार

उपक्रम 
विश्व लेखकांचे साहित्य मंच महाराष्ट्र आयोजित उपक्रम 
दि १६ व १७ जूलै २०२५
कल्पना विस्तार 
विषय.....एखाद्या खोटे बोलणे लगेच समोरच्या व्यक्तीला समजले असते तर?


   खोटे बोलणे ही मनाला जडलेली सवय असते.  वेळीच नाही सुधरवली तर, मग ती सवय अंगवळणी पडत जाते.  इतकी सहजतेने स्विकारली जाते की त्यात त्याला काही वावगे वाटत नाही.
असेच झाले एकदा.  कमलाबाई खोटे  बोलण्याची सवय होती उद्देश काही नसायचा, फुशारकी वा थापा मारणे. त्यांचे खोटे कसे उघडकीस आले पहा.
         विजया व मंजू मैत्रिणी... रहायला जवळ जवळ होत्या. दोघी बराच वेळ गप्पा मारत सोसायटीच्या बाकावर बसल्या होत्या. कमलाबाई तेथूनच पसार होता होता जरा थांबली. दोघी च्या रंगलेल्या गप्पात उगीचच मधे मधे करू लागली. 
आणि सांगू लागली की  सोसायटीत सुंदर गाण्याचा कार्यक्रम  होणार आहे. मला त्यात
 कदाचित निवेदन करण्यास सांगितलं . 
       अगदी खोटी बातमी, पण ती स्वतः चेच खरे पटवून देत राहिली. तिला काय माहित नव्हते , की विजया कमीटीत आहे. तिला सोसायटीच्या सर्व कार्यक्रमाची
तपशील वार माहिती असते. पण माहित नसताना, खोटे बोलणे अंगवळणी पडलेले 
. आणि विजया कमीटीत आहे याची जाणीव नसता सवयीप्रमाणे खोटं बोलली.
          पण  मंजुला कमलची  सवय माहित होती. तिने विजया कमीटीतील सदस्या आहे . तर तुझे खोटे बोलणे उघडकीस आले. आता तरी उगाचच थापा मारणे. सोड.
 सहजच कमलबाई वरमली. व मी जाते ग! मला काम आहे म्हणत निघून गेली.
  खोटे बोलण्याची फजिती झाली.

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

मंगळवार, १५ जुलै, २०२५

सहा शब्दांची कथा

विश्व लेखकांचे साहित्य मंच महाराष्ट्र आयोजित उपक्रम 
दि १४\७\२५
उपक्रमाचे नाव. ...सहज शब्दांची कथा लेखन उपक्रम 
विषय..

संवाद....   माझा चेहरा पाहूनच, संवादाची गरजच  नुरली.

संधी. ..  .    एकदा हाती आलेली संधी ,  सोन्यासम असते

वादळ...  मी पाऊल टाकले ,वादळापूर्वीची शांतता जाणवली.

रात्र.  ...  पहिल्या रात्रीतच  नव ‌दांपत्यांचे सहजीवन संपले.

किमया.   मृगवर्षाची किमयाच  अशी, अवनीची  कायाच बदलली.

ओळख...  उत्तम व्यक्तिमत्व  हीच पंतप्रधानांची  ओळख ठरली.
                

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १४ जुलै, २०२५

कैवल्य \. वैभव शब्दावर चारोळ्या

जगतात   जीवन सारे
 पण अर्थ  हवा जगण्यात
कैवल्याचा विचार करा
तर जगाल  आनंदात

पुनरपि जनमम पुनरपि मरणम
हा तर मंत्रच जीवनाचा 
पण मिळविण्या कैवल्य 
अभ्यास करा गीता बोधाचा

श्री कृष्णाने पार्थास
रणांगणावर दिला बोध 
त्यातून कळले जनांना 
कसा कैवल्याचा घ्यायचा शोध 

अध्यात्मिक व्याप्ती 
असते कठीण काम 
कैवल्या साठी तर
नाही नुसते तीर्थ धाम

ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी 
आहे गीतेचे सार
प्राकृत भाषेत  वर्णिलाय  
कैवल्याचा मार्ग छोट्या   ओव्या आहेत फार 

: कैवल्य मिळविणे
असतेच  कठीण 
नको उतार वयात अपेक्षा 
नाही तर मिळतो जन्म नवीन 

 आहे ना आजचा
किती कठीण विषय 
जीवन जगता कैवल्यचा
लागेल आशय

आत्म मुक्ती साठी
हवी अध्यात्मिक जोड
कैवल्याचा मार्ग  तितका 
वाटतो पण नसे गोड


छान सांगितले तुम्ही 
  आध्यात्मिक बैठक हवी
पण प्रलोभने इतकी
की रोज नवीन नवी

: विठु कैवल्याची मूर्ती 
युगे अठ्ठावीस ऊभा
.
: वाचली ज्ञानेश्वरी
भक्तांचे प्रकार 
वाचता वाचता 
येई मनी कैवल्याचा विचार 

 मोक्ष प्राप्ती म्हणजेच 
मिळणे मार्ग कैवल्याचा 
पण नसे तो सहज
अती काटेरी दुर्गम काट्यांचा

 वृध्दकाळात विचार 
कैवल्याचा मनी
जीव होतो घाबरा 
काय  होणार पुढच्या क्षणी

 नेहमी कर्म माना देव
करूया सत्कर्म सदा
मग कैवल्याच्या मार्ग 
अवघड नसे कला

करतात का खरेच 
कैवल्याची अपेक्षा 
बोलताना बोलतात 
 पुढल्या जन्मीची यापेक्षा

: षड रिपूंना टाळा
मग कैवल्य मार्ग सोपा
लोभ मत्सर हव्यास सोडा
आणि निवांत झोपा

किती लिहू कैवल्यावर
समजतच नाही 
एक एक विचारांची माळ
गुंफतच राही

 दर्शन घडता प्रभु रामाचे 
शबरीला मिळालेजीवन 
सार्थक कैवल्याचे
आनंदली मनोमनी

: कैवल्याचा मार्ग 
आहेची खडतर
मन हवे समाधानी
हेच संत सांगती खरोखर 

कैवल्याची गोडी 
लागली जिवाला 
समजावे भव सागर 
पार  करेल क्षणाला 
वैशाली वर्तक

: विठ्ठलाने भक्तीने
धाडले  पुष्पक विमान 
तुकोबांच्या साठी 
तोच असे कैवल्याचा मान
वैशाली वर्तक



वैभव.  
#########
जगा सदा समाधानी 
ऐका संतांची वाणी
वैभव भासेल जीवनी
गाऊया आनंदाची गाणी 

भारताचे वैभव समृद्धी 
ब्रिटिश लोकांना दिसली 
त्यांची साम्राज्य स्थापन 
करण्याची जिज्ञासा वाढली

संसार सुरू केला 
तेव्हा होती सामान्य स्थिती
कष्टाने मिळाले वैभव 
अन् आता सुखवस्तू परिस्थिती 

सुदामा गेला कृष्णाकडे
 वैभव पाहूनडोळे दिपले
अन् आणलेले पोहे
देण्यास मन काचरले

साधे चहा विकणारे
  मोदीजी पंतप्रधान
 त्यांचे बौद्धिक वैभव 
त्यांना यश देण्यात  ठरले वरदान

वैभव समृद्धी साठी
करावी लागते मेहेनत
 होतो वैभवशाली
कष्ट करिता अविरत 

आपली मराठी भाषा
आहे  वैभवशाली खूप
म्हणूनच ठरली अभिजात
 मराठी जनांना आला हुरुप

लेख मनोरंजन

मनोरंजन 
मनाला आनंद देते  ते मनोरंजन.    मनाला आनंद कितीss किती प्रकारे मिळतो ना  .! वाचन, कला, क्रीडा ,भटकंती, संगीत,  इव्हन व्यायाम, सिनेमा वैगरे  पहाणे.   ब-याच प्रवृत्ती तून मनाला आपण  रिझवू शकतो.
 मनाला रीझविणे,  मन आनंदित करणे कोणाला आवडणार नाही  त्यामुळे मनाला रंजन हवेच असते.. आणि मन असतेच चंचल ते तर नुसत्या विचारानेच त्याचे... त्याचे.  मनाने विचार करून मनोरंजनाची साधने शोधतच असते. 
        आता पहा. होता सकाळ ... सुंदर भक्ती रसाची भुपाळी ,भजन ऐकून मन कसे प्रसन्न आनंदित होते. तर    हे  झाले संगीत . एक माध्यम मनोरंजनाचे. जे नुसते आनंदच नाही तर खेदजनक  दु:खी मनाची निराशा दूर सारून  प्रफुल्लित आंनदी करते . 
  तसेच दुसरे मनोरंजन म्हणजे व्यायाम करणे. ज्यात क्रिडा प्रकारात स्वीमींग ,टेबल टेनिस indoor वा out door games  अनेक  प्रकार येतात.आणि.खेळ खेळून मन ताजेतवाने होऊन मनस्वी आनंद मिळतो.
आणि मस्त रंजन होते.
    वाचन... या वाचना सारखे दुसरे मनोरंजनाचे साधन नाही.  उगा का पुस्तकाला मित्र मानतात .जो ज्ञान तर देतोच  व मनोरंजन पण  करतो. 
  प्रवास हे तर प्रमुख प्रिय साधन  मनोरंजनाचे .म्हणून च तर ऑफीसेस  मधून LTC सवलत देतात की कर्मचारी  भटकून रिफ्रेश होउन पुन्हा कामास उत्तेजित होतात. व आनंदाने पुन्हा कामास जुंपण्यास तयार होतो.
          उन्हाळ्यात थंडीत  फिरणे हिंडणे याने मनाचे रंजन होते. म्हणून तर उन्हाळ्याच्य सुट्टी ची आतुरतेने जन वाट पहात असतात.
    एवढेच काय सण आणि उत्सव हे पण मनोरंजना साठीच असतात. धार्मिक हैतू असतोच पण त्या सण वारा मुळे मित्र , आप्तेष्टांना भेटून मन आनंदाने भरून येते.मग त्यात सिनेमा पहाणे. गाणे वादन नृत्य यांचे प्रदर्शन करून मनोरंजनाची भर होते,
    सध्या तर मोबाईल एक मनोरंजनाचे महत्वाचे साधन  . काय हवे ते मागा  गुगल महाराज सदैव हजर
आज काल तर मोबाईल वर ज्ञान माहिती, अनेक गेम ,ज्या मुळे एकटे पणा जिवंत नाही . अगदी तास तास 
वेळ मनाला आनंद देण्यात मोबाईल मागे पडत नाही.अगदी खाद्य पदार्थांची रेसिपी पासून सर्व प्रकारची माहिती वाचून मनाला आनंदित करते. 
  अरे आजच पहा आम्ही 2/3कुटुंब  एकत्रित होऊन मस्त गप्पा गोष्टी करत ... अनेक विषय हाताळले 
एक दुस-याचे विचार ऐकले तर कशी  मस्त मनोरंजक संध्याकाळ. पसारा केली. 
    उगा का म्हणतात आनंद भरलाय चोहीकडे इकडे तिकडे वर खालती  शोधा म्हणजे सापडेल.. मनोरंजन 
करण्यास नेहमी   काय करावे असा विचार करण्याची गरज नसते

मंगळवार, ८ जुलै, २०२५

ललित लेख. गुरु चरणी ठेवीतो भाव

शब्द रजनी कथा ललित लेख लेखन साहित्य समूह पुणे 
आयोजित 
ललित लेख लेखन 
दि ८\७\२५
विषय ... गुरू चरणी ठेवीतो भाव 
शीर्षक.     मी अजुनही विद्यार्थी  

         येता जन्मा गुरू हा हवाच.आई असे आद्य गुरू.जिचे बोट धरूनी चालता
शिक्षण देणे सुरू.    .जसे होतो मोठे गुरू पदांची संख्या वाढत जाते. जीवनात अनेक गुरू लाभतात जे ज्ञान देतात व जीवन सुलभ करतात. 

येताची जुळूनी  । 
गुरू  कृपा योग ।। 
तो असे सुयोग
जीवनात |

   खरच  अगदी उचित कथन आहे.   वरच्या माझ्याच ओळी  मला आठविल्यात. शालेय जीवनात विद्या देणारे व त्याच बरोबर व्यवहार ज्ञान सहजतेने देणारे गुरू . त्यांच्या तर आपण आदर भाव ठेवून ....त्यांना वंदनीय मानून ज्ञान संपादन केले
म्हणूनच आपण जीवनात काही करु शकलो. , नुसतेच करु शकलो  नाही तर

गुरू कृपा योगे  । 
तरलो तरलो ।। 
आता  उध्दरलो।  
जीवनात  ।।           

  असे म्हटले तर काही चुकीचे नाही.
गुरू कृपेचा तो योग. आजही ते भाव मला आठवितात. त्यांची कृपा झाली म्हणून ज्ञानी झालो ,त्याचा आज आनंद वाटतो. ज्ञान संपादन करून भविष्याची वाटचाल सरळ सुलभ झालीच.. शिवाय संकटी. कठिण प्रसंगी पण कसे तरून जायचे ,बाहेर  निघायचे या ज्ञानाचा उपयोग झाल्याने, जीवनी दु:ख निवारण झाले.कुठल्या शंका कुशंकेला मनी थारा दिला नाही. 
   आणि हो ....नेहमी निशा नसतेच...  निशे नंतर उषा पण येते ...असे समजवित गुरू ची प्रेरणा, वेळोवळी कौतुकाची थाप ,हे सारे गुरूंचे मनी भाव अजूनही स्मरणात आहे.
            जीवनात गुरू शिष्य नाते चालूच रहाते. ज्याच्या पासून ज्ञान मिळते तो गुरू..
मग तो आपल्या हून लहान पण असू शकतो. 
         साधा किटक  कोळी पहा.. पण जिद्द असावी मनी तरच यश मिळेल ,काम पूर्णत्वास जाईल . हे  शिकवितोच ना! 
 तो कोळी चिकाटीने शंभरदा पडून जाळे  पूर्ण करतोच ना.? तर असे गुरू चे भाव मनी असावेत. निसर्ग पण गुरू शिकवितो कसे जगावे. तर
    
जीवनी शिकणे हे गरजेचे
तर वाढे  आपले ज्ञान .
विद्यार्थी अवस्था महत्त्वाची 
ठेवा सदा त्याची जाण.   
            असे म्हटले तर चुकीचं  ठरणार नाही.

     जाणूनी महिमा गुरूचा
     मिळण्या जीवनास आकार 
    विद्यार्थीनी मी रहाते सदैव 
    आयुला भक्कम आधार .

तर गुरू विणा नसे उध्दार  हे सदा भाव मनी ठेवावे .

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

सोमवार, ७ जुलै, २०२५

लेख घन ओथंबून आले

 ग्रीष्माच्या तप्त झळा अंगाची लाही करत होत्या. आदित्यराजे जणू आग ओकीत होते. सारी सृष्टी तप्त उन्हाने

कोमेजली गेली होती.गुरांना हिरवा चारा मिळत नव्हता.

मानवाच्या अती प्रगती च्या लालसेने सध्या वनराई पण कमी झालेली , त्यामुळे वृक्षेच सावली शोधत होती तर पथिक, गुरे यांना सावली कोठुन मिळणार. जो तो गर्मी ने हाशहूश करत ,आकाशाकडे पहात  बरस रे बाबा आता म्हणून आकाशाकडे नजर लावून बसला होता.

      वसुंधरा तर तापून तापून तिच्या मातीचा कणन कण तप्त झाल्याने शिवारात तील माती भेगाळलेली होती. व भुकेलेल्या बाल्यापरि परि तोंड पसरवूनी ममृग जलासाठी आसुसलेली होती . पण यंदा वरूणाची कृपा जरा लवकरच झाली ,6जूनला मृग नक्षत्र लागते पण यंदा आकाशात काळ्या मेघांची गर्दी दाटली .

बळीराजाला  पेरणीचीतयारी करण्यात घाई करावी लागणार या विचारात होता.

  गर्जत बरसत या मेघांनो 

   नको नुसती गर्दी गगनात 

   गडगडाटाने बरसा  रे

   काळी माय आसुसली शिवारात.

    सुरु झाला सोसाट्याच्या वारा, पक्षांना पण पावसाची चाहूल लागली. इकडून तिकडे पंख पसरून, उडु लागली. पाला पाचोळा पण जणु आनंदाने फेर धरून वा-या च्या तालावर गोल गोल गिरक्या घेत उडू लागला

आणि जलधारा नभातून बरसू लागल्या. मग


वाजवित ढोल ताशे 

मेघ राजा बरसला

नृत्य  दावी सौदामिनी

मोर आनंदे नाचला

  तप्त वसुंधरा पण तिच्या सख्यांना भेटण्यासाठी आतुरतेने वाट पहात होती . तिच्या वरुण सख्याला अलिंगन

देऊन तिची तृष्णा तृप्त झाली. आणि  वारा पण त्या आनंदात सामील होऊन आसमंतात मृद्गंध जणू पसरवत होता. सारी जन मन आनंदाने प्रसन्न झाली. जणू

           

चिंब झाली वसुंधरा

आल्या पावसाच्या धारा

ओल्या झाल्या वृक्षवेली

गाणी गात फिरे वारा


घन निळा बरसला मग हळूहळू  रिमझिम पाऊस धारा जलधारा बरसल्या. आसमंती गारवा आला जनांची गर्मीने होणारी जिवाची काहीली थांबली. 


मुले नाचती आनंदे

गात गाणी पावसाची

टपटप झेली धारा

माळ दारी  पागोळ्याची

     अशा रितीने जलधारा बरसून  घन ओथंबून आलेले आकाश रिक्त झाले.थंड वारा मस्त जिवाला सुखावत होता. वृक्ष वल्ली पाण्याने स्वच्छ धुवून निघाल्या होत्या.पानांवर तितकी जाणवित होती .शेवटी निसर्गाचे 

जलाची किमया आगळीच.



वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

शुक्रवार, ४ जुलै, २०२५

गझल भुजंग प्रयात पावसाचा दिन

 भुजंग प्रयात 

लगावली

लगागा लगागा लगागा लगागा 

पहाता पहाता कसा वेळ गेला

रवीने नव्याने पुन्हा खेळ केला


कुणाला  \जराही\ समजले\च नाही

दिवस की\ निशेचा\ मनी घो\ळ   केला


ढगाआ\ ड होता \तिमीरच\ पसरला

रवीने ढगांशी पहा मेळ  केला.    





वैशाली वर्तक

पहाता पहाता सकाळी 

 शलाका नभाचा पसारा पसरवी


मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...