शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

अष्टाक्षरी काव्य चोरी

सावली प्रकाशन  समुह 
अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा

   काव्यचोरी

  लेखणीला द्यावी  धार
  विचारांना द्या प्रेरणा
  नका करु काव्य चोरी
  द्यावी बुध्दीला चेतना

  करा  साहित्य वाचन
  मिळे विचार नवीन  
  शब्द भंडार समृद्ध  शब्द होतील समृद्ध 
  येते लिखाणी प्राविण्य

  नको चोरी साहित्याची 
   शारदेचा ठेवा मान
   स्वरचित लिखाणास
   मिळे जगती सन्मान

    करी विचारांची चोरी
    दावी लिखाणी हुशारी
    शारदेच्या दरबारी
    करा भाषेची तयारी

    स्वरचित साहित्याने
    मोद मिळे मना खरा
    फुलविता शब्द मळा
    वाहे साहित्याचा झरा

वैशाली वर्तक 5/12/20
अहमदाबाद

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

उंच जाई माझा झोका

मोहरली लेखणी साहित्य  समूह  आयोजित  भव्य 
काव्य लेखन स्पर्धा
विषय --उंच जाई माझा झोका


उंच  जाई माझा झोका

नसे सदा हिरवळ
कधी खडतर वाट
तर पहावी सुखद 
असा जीवनाचा थाट

पेलावीत आव्हाने ती  
टाका कष्टाचे पाऊल
उंच जाई झोका मग
लागे यशाची चाहुल

मनी जे जे कल्पियले
भाग्ये  दिला सदा मोका
झाले साध्य जीवनात
उंच गेला  माझा झोका


मिळविली निपुणता
घेता पाण्यात भरारी
आता करीते प्रयत्न 
देई लेखणी उभारी


जडे निवृत्त काळात
मिळे साथ लेखणीची
आवडीचा छंद जीवा
सेवा माय मराठीची


वैशाली वर्तक
अहमदाबाद 1/12/20

मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

प्रकाश तारा (हायकू) निसर्ग

काव्यस्पंदन राज्यस्तर 02
विषय --प्रकाश तारा
हायकू रचना
**नभीचा तारा*

नभात तारा
येता सूर्य  आवरे
 त्याचा पसारा                 1

सांजवेळेला
वाहतो मंद वारा
चमके तारा                2

मंद लहरी
गीत गातोय वारा
अंगी शहारा                3

शशी येताच
दिपला नभी तारा
रात्री  पहारा                 4

वेगळी शान      
शशी संगे शोभतो
दैदिप्यमान                    5

वैशाली वर्तक
अहमदाबाद 15/11/20



***************************************

निसर्ग 

खरे पहाता
निसर्ग हाची देव
अमुल्य ठेव        1

देवे निर्मीला
निसर्ग  मनोहर
आहे सुंदर            2


निर्मीले देवे
सुंदरची  आकाश
देण्या प्रकाश        3

भास्कर  रवी            
अविरत नेमाने                                     
नित्य क्रमाने         4                             

 निसर्गा तुझी
 ठेव रे कृपा दृष्टी 
चालण्या सृष्टी         5

समतोलता
राखण्या  निसर्गाची
घेउ दक्षता               6

रवी शशी ते
उगवतात नित्य
सृष्टीचे सत्य            7

लाविता वृक्ष 
निसर्गची हिरवा
 रम्य बरवा              8

नदी सागर
देवाचे वरदान     
सुखी  घागर           9




बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

पंचाक्षरी चित्रावरुन मुग्ध मानसी

स्पर्धे साठी 
रोही पंचाक्षरी  (चित्र आधारित)

गुज मनीचे....

मुग्ध मानसी
स्तब्ध राहसी
गुज मनीचे
मुखी दावसी

हास्य पाहूनी
स्तब्ध राहूनी
भाव कळले
तुला बघुनी

वाट पाहती 
डोळे बोलती
अक्ष तुझे ची
हळु सांगती

मृग नयनी
हसू लोचनी
रुप गर्विता
दिसे वदनी

तुला पाहणे
नित्य रमणे
ओढ तुझीच
सदा स्मरणे

 .....वैशाली वर्तक     20/10/2019
8141427430

शब्द माझे सोबती\शब्द माझा सखा

येता मनात विचार
येती   अस्फूट अधरी
किती घाई ती तयांना
उतरण्या कागदावरी

  शब्द माझेची  सोबती 
बोलणेही ते शब्दांशी
उरातल्या स्पंदनाना
तोलणेते भावनेशी

चाले खेळ हा शब्दांचा
येती धावत सहज
जणु खुणावूनी वदती
आहे माझीच गरज

 प्रेम भाव तयावर
 करी  हसूनी स्वागत
खरोखरी  माझे साथी
पूर्ण  करिती मनोगत

 शब्द फुले गुंफुनीया
होते तयार कविता
देते मजला आनंद 
होते मनाची पूर्तता

वैशाली वर्तकमाझी शब्द सखी

कल्याण डोंबिवली महानगर
विषय - शब्द सखा माझा

  

दिन उजाडता
येते तिची सय
शब्द सखी माझी 
करी हयगय

धावूनी मनात
करीतात गर्दी
घाई लेखणीला
लावण्यास वर्दी

लागताच वर्दी
रूप साहित्याचे
संवाद वा काव्य
दावी  वाङमयाचे

देती साथ मला
राखे विचारात
कसा जातो दिन
कळे न क्षणात


मिळे विचारांना
सहजच वाट
उमटे भावना
साहित्याचा थाट

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सहाक्षरी निसर्ग

सहाक्षरी

निसर्गाचे किती
गावे गुण गान
सदा असे तोचि
ईश्वर समान

तयाच्या कृपेने
सजे सारी सृष्टी 
भरलेली त्यात
आनंदाची दृष्टी 

सदा निसर्गाचा 
राहो सम तोल 
कधीच न व्हावा
तो अ समतोल

अती वृष्टी होता
येतो ओला दुष्काळ
गवसते सुख
न दिसे सुकाळ

अवकाळी धारा 
बरसल्या अशा
सर्स्व बुडाले
झाली अवदशा

नको कधी कोप
तुझा रे ईश्वरा
सदा ठेव सुखी 
तूची विश्वंभरा

नसे सृष्टी  कोप
मिनवाचा लोभ
प्रगती नावाचा 
थांबवावा क्षोभ

भुकंप  प्रलय
निसर्ग  कोपाचे
होतसे घातक
सृष्टी च्या नाशाचे

वैशाली

काव्यांजली जीवन

2..3..2..1 काव्यांजली
जीवन

मानव जन्माचे
करुया सदा सार्थक
नको निरर्थक 
कदापी

जीवनात  असे 
सदा ऊषा निशा
नको निराशा
मनी

सरीता पहा 
करिते कधी खंत
नसे उसंत
तिजला

गुलाबाचे जीवन
जरी असते काट्यात
सुख वाटण्यात
सदाकाळ

जडवावा छंद
जीवनी एखादा मनाला
मोद तनाला
होतअसे

आला पहा 
आनंदाचा उत्साहाचा क्षण
समजा सण
सदासाठी

भरलेला आनंद
आहे सा-या जगती
पहा सभोवती
शोधुनीया

फुलात  पानात
निसर्गाने  भरला मोद
मनाचा शोध
करावा

वैशाली वर्तक

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...