बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

शब्द माझे सोबती\शब्द माझा सखा

येता मनात विचार
येती   अस्फूट अधरी
किती घाई ती तयांना
उतरण्या कागदावरी

  शब्द माझेची  सोबती 
बोलणेही ते शब्दांशी
उरातल्या स्पंदनाना
तोलणेते भावनेशी

चाले खेळ हा शब्दांचा
येती धावत सहज
जणु खुणावूनी वदती
आहे माझीच गरज

 प्रेम भाव तयावर
 करी  हसूनी स्वागत
खरोखरी  माझे साथी
पूर्ण  करिती मनोगत

 शब्द फुले गुंफुनीया
होते तयार कविता
देते मजला आनंद 
होते मनाची पूर्तता

वैशाली वर्तकमाझी शब्द सखी

कल्याण डोंबिवली महानगर
विषय - शब्द सखा माझा

  

दिन उजाडता
येते तिची सय
शब्द सखी माझी 
करी हयगय

धावूनी मनात
करीतात गर्दी
घाई लेखणीला
लावण्यास वर्दी

लागताच वर्दी
रूप साहित्याचे
संवाद वा काव्य
दावी  वाङमयाचे

देती साथ मला
राखे विचारात
कसा जातो दिन
कळे न क्षणात


मिळे विचारांना
सहजच वाट
उमटे भावना
साहित्याचा थाट

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...