काव्यस्पंदन राज्यस्तर 02
विषय --प्रकाश तारा
हायकू रचना
**नभीचा तारा*
नभात तारा
येता सूर्य आवरे
त्याचा पसारा 1
सांजवेळेला
वाहतो मंद वारा
चमके तारा 2
मंद लहरी
गीत गातोय वारा
अंगी शहारा 3
शशी येताच
दिपला नभी तारा
रात्री पहारा 4
वेगळी शान
शशी संगे शोभतो
दैदिप्यमान 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद 15/11/20
***************************************
निसर्ग
खरे पहाता
निसर्ग हाची देव
अमुल्य ठेव 1
देवे निर्मीला
निसर्ग मनोहर
आहे सुंदर 2
निर्मीले देवे
सुंदरची आकाश
देण्या प्रकाश 3
भास्कर रवी
अविरत नेमाने
नित्य क्रमाने 4
निसर्गा तुझी
ठेव रे कृपा दृष्टी
चालण्या सृष्टी 5
समतोलता
राखण्या निसर्गाची
घेउ दक्षता 6
रवी शशी ते
उगवतात नित्य
सृष्टीचे सत्य 7
लाविता वृक्ष
निसर्गची हिरवा
रम्य बरवा 8
नदी सागर
देवाचे वरदान
सुखी घागर 9
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा