शनिवार, २५ जुलै, २०२०

ल पावसाच्या कविता पंडाव खेळ पावसाचा

 विषय- लपंडाव  खेळ पावसाचा



येता श्रावण महिना
हिरवळ दिसे चोहीकडे
क्षणात चमके  ऊन
दुस-या क्षणी सर पडे

हिरवी झाडे हिरव्या वेली
हरित रंगच दिसे सर्वत्र 
पांधरुन शाल हिरवी
अवघ्या धरेचा रंग एकमात्र

आभाळात ढगांचा गडगडाट
दामिनी चमके काळ्या ढगात
सर पडूनी जाता पुन्हा 
सूर्य   ढगातून डोकवे नभात

लंपडाव ऊन पावसाचा
पडे सरीवर सरी तालात
धरेला चिंब भिजवूनी
उन्ह कोवळे पडे क्षणात

झाकोळते आकाश मेघांनी
 भासे  भर दिवसा  सांज
जल बरसूनी जाता पुन्हा 
दर्शन देतात रवी राज

लपंडावाच्या या खेळातून
मधेच दिसे इंद्रधनु शानदार      
लोभस रुप  पहा निसर्गाचे       
श्रावण मास असे बहारदार       


वैशाली वर्तक.
अहमदाबाद 

सोमवार, २० जुलै, २०२०

पावसाच्या कविता.. घन निळ्या श्रावणात

मोहरली लेखणी
घन निळ्या  श्रावणात ( अष्टाक्षरी)**

सरताच मृग सरी
कृष्ण  मेघ  अंबरात
होई  दाटी ती मेघांची
सरी येती श्रावणात

खेळ ऊन पावसाचा
चाले सदा दिनभर
शोभिवंत इंद्रधनु 
मधे दिसे मनोहर

चिंब भिजली अवनी
हिरवळ चोहीकडे
मोह न आवरे मना
वाटे पाहु कुणी कडे

सणवार श्रावणात
आनंदाची उधळण
लेकी बाळी घरी येता
उत्साहाने भरे मन

शिवारात डोले पिक 
वाढण्याची तयां घाई
बळीराजा खुश मनीं
आनंदाने गीत गाई
......................................
 लपंडाव खेळ पावसाचा

येता श्रावण महिना
हिरवळ दिसे चोहीकडे
क्षणात चमके  ऊन
दुस-या क्षणी सर पडे

हिरवी झाडे हिरव्या वेली
हरित रंगच दिसे सर्वत्र 
पांधरुन शाल हिरवी
अवघ्या धरेचा रंग एकमात्र

आभाळात ढगांचा गडगडाट
दामिनी चमके काळ्या ढगात
सर पडूनी जाता पुन्हा 
सूर्य   ढगातून डोकवे नभात

लंपडाव ऊन पावसाचा
पडे सरीवर सरी तालात
धरेला चिंब भिजवूनी
उन्ह कोवळे पडे क्षणात

झाकोळते आकाश मेघांनी
 भासे  भर दिवसा  सांज
जल बरसूनी जाता पुन्हा 
दर्शन देतात रवी राज

लपंडावाच्या या खेळातून
मधेच दिसे इंद्रधनु शानदार      
लोभस रुप  पहा निसर्गाचे       
श्रावण मास असे बहारदार       


वैशाली वर्तक.
अहमदाबाद 

(बाल कविता) चल पावसात भिजू

यारिया साहित्य  कला
अष्टाक्षरी बाल कविता
विषय- चल पावसात भिजू

शीर्षक- हौस भिजण्याची

चला पावसात भिजू
झेलू पावसाचे पाणी
भिजण्याची  मजा न्यारी
खेळू नाचू गाऊ गाणी

पावसात भिजण्याची
 पूरी करु आज हौस
सरीवर सरी येती
आला रे मोठा पाऊस

नभी गडगडे ढग
मधे वीज चमकते
नका घाबरु वीजेला
बघ म्हातारी दळते

फाडा वहीची ती पाने
करु कागदाच्या  होड्या
सोडू पाण्यात  तयांना
मस्ती करु ,थोड्या खोड्या

पहा पागोळ्या पडती
भरु    थेंब ओंजळीत 
फेकू अंगावर  पाणी
मजा येते ओसरीत

वैशाली वर्तक



खट्याळ सासू नाठाळ सून



खट्याळ सासू  नाठाळ सून

 

  खट्याळ सासू  नाठाळ सून

 जोडी अशी सासू सूनेची
मग काय रोजची गंमत
कोण कोणास बोलणार 
ऐकण्यास येई खूपच जंमत

खट्याळ सासू वदली
करुया का आज  पालेभाजी?
सून, नक्कीच  वदणार... बोलणार 
चालू द्या ,सदा तुमचीच मर्जी .

खट्याळ सासू  करी पूजा.   बसता पूजेला
तेव्हाच सून लावी टीवी जोरात
नाठाळपणा तिचा ती दावी 
त्रास होई  सासुला स्तवनात

नाठाळ सूनेने केला ....लादी पोछा
म्हणे कौतुकाने कसे,... स्वच्छ पहा घर
काढावी अडगळ आताच
खट्याळ सासू वदली त्यावर .

मते जुळणे होई कठीण 
वाद विचारांची  सदा रंगत
असून अशी जोडी दोघांची
तरीही जमते छान संगत


अशी जोडी सासू सूनेची
दिवसभर मजेचा खेळ
एकीचे तोंड पुर्वेस तर
दुजीचा कधीच न जमे मेळ

वैशाली वर्तक
अहमदाबाद 




वैशाली वर्तक

शनिवार, १८ जुलै, २०२०

चाराक्षरी राधा कृष्ण

यारिया साहित्य  कला आयोजित
चित्र  प्राणु चाराक्षरी
स्पर्धेसाठी
चित्र  आधारित चाराक्षरी

मंत्र मुग्ध
झाले क्षण
एकरुपी
अंतर्मन..

एक चित्त
निरंतर
नसे जीवा
ते अंतर..

सात्विकता
मुखावर 
पहा कशी
क्षणभर..

कृष्णा  सवे
येता क्षणी
सुखावली  
राधा मनी..

जीवा लागे
एक छंद
मिळे सदा
स्वर्गानंद..

मिटलेल्या 
नयनात
कृष्ण छबी
अंतरात..

जळी स्थळी
तीज मात्र 
दिसे कृष्ण
 एकमात्र..

मन तिचे
सुखावले
पहा कसे 
विसावले..

वैशाली वर्तक






चाराक्षरी
स्पर्धेसाठी
विषय- राधा कृष्ण


जळी स्थळी
तीज मात्र 
दिसे कृष्ण 
एकमात्र

जीवा लागे
एक छंद
तिला मिळे
स्वर्गानंद

कृष्णा सवे
येता क्षणी
सुखावते
राधामनी

त्या राधेच्या
चिंतनात
कृष्ण  नाद
कंकणात

नको नेऊ
मथुरेस
 तू आक्रुरा
श्रीकृष्णास

विनवते 
ती राधिका
कोसताती
 त्या गोपिका

कैसे कंठु 
एक दिन
तुजवीण
जीव क्षीण 

वेड लावे
तो मुरारी
राधा भोळी
ती बावरी

प्रेमभक्ती      
 चे प्रतिक          
 प्रेम त्यांचे
ते सात्त्विक    


वैशाली वर्तक
अहमदाबाद 
गुजरात 



स्वप्न गंध साहित्य समुह
विषय..कृष्णाची विविध रुपे 
शीर्षक.. कृष्ण लीला वरुन नावे
प्रकार चाराक्षरी

सोड वाट 
"नंदलाला"
जाऊ दे ना 
बाजाराला.

सोड "कृष्णा "
तू ओढणी
आल्या बघ
गवळणी

"बंसीधर"
वृंदावनी
वेणु वाजे
रानी वनी

नाव तुझे
रे "माधवा"
राही मुखी
तो गोडवा

यशोदेचा 
"घननीळा"
वाटे तिला 
लडिवाळा

वाजविता
वेणु "कान्हा"
गाईनांही
फुटे पान्हा

खेळ चाले
चेंडू फळी
"घनश्याम"
नील जळी

"राधेश्याम"
काढी खोडी
दुभत्याचे
माठ फोडी.

रास लीला
गोपी संग
रणछोड
त्यात  दंग

विश्वरुप
पाही मैया
दाखविता
तो "कन्हैया"

वैशाली वर्तक
अहमदाबाद







शुक्रवार, १७ जुलै, २०२०

ओढ तुझी छळते मजला

शब्द रजनी आयोजित
उपक्रम- दशपदी काव्य

विषय-  ओढ तुझी छळते मला

कसे सांगू मी तुला, आठवण येते सदा
कधी येशील  तू, हाच प्रश्न मनी सदा

भरारी घेण्या जीवनी जाणे तुझे जरुरी
सारे समजते मनाला तरी खंत वाटे ऊरी

होता सांजवेळ पाहे मी सदा वळूनी
वाटे आलास  तू दारी  आई हाक मारुनी

तव येथे असण्याचा होतो सदाची भास 
तव संगे रहाण्याचा मनी लागलाची ध्यास

आला श्रावण मास येतील  ते सणवार
ओढ तुझी छळते रे वाट  तुझी पाहणार

वैशाली वर्तक

जंगल झाडीत बालकविता

जंगल सफारीत जाऊ चला     
कुतुहल मनी  प्राण्यांचे  तुला    

समोर  पहा हे वानर प्राणी   
खात आहे सारे मानवा वाणी   
देताच पोळी घेऊन पळाला   
कुतूहल मनी प्राण्यांचे  तुला    


हरीणाची जोडी आली धावत   
बसले  दोघे  गवत  चावत   
भित्रट चपळ धावूनी गेला 
कुतूहल   मनी प्राण्यांचे   तुला

अक्राळ विक्राळ हा  ऐटदार   
सिंह गर्जना त्याची जोरदार    
आली ती डरकाळी ऐकायला   
कुतूहल मनी प्राण्यांचे तुला   

पक्षी  सरपटणारे  हे प्राणी  
पहातच हिंडलो गात गाणी    
गंमत वाटली, आनंद झाला   
कुतूहल  मनी प्राण्यांचे तुला  


वैशाली वर्तक

चित्र काव्य करू हितगुज

शब्द रजनी साहित्य समूह पुणे  चित्र काव्य  अष्टाक्षरी  शीर्षक  ... करु हितगुज  हात  हातात घेतला जाऊ समुद्र  किनारी मौज लाटांची पहात बसु बाळुत...