सोमवार, २० जुलै, २०२०

(बाल कविता) चल पावसात भिजू

यारिया साहित्य  कला
अष्टाक्षरी बाल कविता
विषय- चल पावसात भिजू

शीर्षक- हौस भिजण्याची

चला पावसात भिजू
झेलू पावसाचे पाणी
भिजण्याची  मजा न्यारी
खेळू नाचू गाऊ गाणी

पावसात भिजण्याची
 पूरी करु आज हौस
सरीवर सरी येती
आला रे मोठा पाऊस

नभी गडगडे ढग
मधे वीज चमकते
नका घाबरु वीजेला
बघ म्हातारी दळते

फाडा वहीची ती पाने
करु कागदाच्या  होड्या
सोडू पाण्यात  तयांना
मस्ती करु ,थोड्या खोड्या

पहा पागोळ्या पडती
भरु    थेंब ओंजळीत 
फेकू अंगावर  पाणी
मजा येते ओसरीत

वैशाली वर्तक



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...