सोमवार, २० जुलै, २०२०

खट्याळ सासू नाठाळ सून

खट्याळ सासू  नाठाळ सून

 

  खट्याळ सासू  नाठाळ सून

 जोडी अशी सासू सूनेची
मग काय रोजच गंमत
कोण कोणास बोलणार 
ऐकायला येईल जंमत

खट्याळ सासू बोले
करुनच आज  पालेभाजी
सून नक्कीच  वदणार
चालवा सदा तुमची मर्जी 

खट्याळ सासू  करी पूजा
तेव्हाच लावी टीवी जोरात
नाठाळपणा तिचा ती दावी 
त्रास देई  सासुच्या स्तवनात

नाठाळ सूनेने केला लादी पोछा
म्हणे कसे स्वच्छ पहा घर
काढावी अडगळ आताच
खट्याळ सासू वदली वर

अशी जोडी सासू सूनेची
दिवसभर मजेचा खेळ
एकीचे तोंड पुर्वेस तर
दुजीचा कधीच न जमे मेळ

वैशाली वर्तक
अहमदाबाद 




वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...