शनिवार, १८ जुलै, २०२०

चाराक्षरी राधा कृष्ण

यारिया साहित्य  कला आयोजित
चित्र  प्राणु चाराक्षरी
स्पर्धेसाठी
चित्र  आधारित चाराक्षरी

मंत्र मुग्ध
झाले क्षण
एकरुपी
अंतर्मन..

एक चित्त
निरंतर
नसे जीवा
ते अंतर..

सात्विकता
मुखावर 
पहा कशी
क्षणभर..

कृष्णा  सवे
येता क्षणी
सुखावली  
राधा मनी..

जीवा लागे
एक छंद
मिळे सदा
स्वर्गानंद..

मिटलेल्या 
नयनात
कृष्ण छबी
अंतरात..

जळी स्थळी
तीज मात्र 
दिसे कृष्ण
 एकमात्र..

मन तिचे
सुखावले
पहा कसे 
विसावले..

वैशाली वर्तक






चाराक्षरी
स्पर्धेसाठी
विषय- राधा कृष्ण


जळी स्थळी
तीज मात्र 
दिसे कृष्ण 
एकमात्र

जीवा लागे
एक छंद
तिला मिळे
स्वर्गानंद

कृष्णा सवे
येता क्षणी
सुखावते
राधामनी

त्या राधेच्या
चिंतनात
कृष्ण  नाद
कंकणात

नको नेऊ
मथुरेस
 तू आक्रुरा
श्रीकृष्णास

विनवते 
ती राधिका
कोसताती
 त्या गोपिका

कैसे कंठु 
एक दिन
तुजवीण
जीव क्षीण 

वेड लावे
तो मुरारी
राधा भोळी
ती बावरी

प्रेमभक्ती      
 चे प्रतिक          
 प्रेम त्यांचे
ते सात्त्विक    


वैशाली वर्तक
अहमदाबाद 
गुजरात 



स्वप्न गंध साहित्य समुह
विषय..कृष्णाची विविध रुपे 
शीर्षक.. कृष्ण लीला वरुन नावे
प्रकार चाराक्षरी

सोड वाट 
"नंदलाला"
जाऊ दे ना 
बाजाराला.

सोड "कृष्णा "
तू ओढणी
आल्या बघ
गवळणी

"बंसीधर"
वृंदावनी
वेणु वाजे
रानी वनी

नाव तुझे
रे "माधवा"
राही मुखी
तो गोडवा

यशोदेचा 
"घननीळा"
वाटे तिला 
लडिवाळा

वाजविता
वेणु "कान्हा"
गाईनांही
फुटे पान्हा

खेळ चाले
चेंडू फळी
"घनश्याम"
नील जळी

"राधेश्याम"
काढी खोडी
दुभत्याचे
माठ फोडी.

रास लीला
गोपी संग
रणछोड
त्यात  दंग

विश्वरुप
पाही मैया
दाखविता
तो "कन्हैया"

वैशाली वर्तक
अहमदाबाद







शुक्रवार, १७ जुलै, २०२०

ओढ तुझी छळते मजला

शब्द रजनी आयोजित
उपक्रम- दशपदी काव्य

विषय-  ओढ तुझी छळते मला

कसे सांगू मी तुला, आठवण येते सदा
कधी येशील  तू, हाच प्रश्न मनी सदा

भरारी घेण्या जीवनी जाणे तुझे जरुरी
सारे समजते मनाला तरी खंत वाटे ऊरी

होता सांजवेळ पाहे मी सदा वळूनी
वाटे आलास  तू दारी  आई हाक मारुनी

तव येथे असण्याचा होतो सदाची भास 
तव संगे रहाण्याचा मनी लागलाची ध्यास

आला श्रावण मास येतील  ते सणवार
ओढ तुझी छळते रे वाट  तुझी पाहणार

वैशाली वर्तक

जंगल झाडीत बालकविता

जंगल सफारीत जाऊ चला     
कुतुहल मनी  प्राण्यांचे  तुला    

समोर  पहा हे वानर प्राणी   
खात आहे सारे मानवा वाणी   
देताच पोळी घेऊन पळाला   
कुतूहल मनी प्राण्यांचे  तुला    


हरीणाची जोडी आली धावत   
बसले  दोघे  गवत  चावत   
भित्रट चपळ धावूनी गेला 
कुतूहल   मनी प्राण्यांचे   तुला

अक्राळ विक्राळ हा  ऐटदार   
सिंह गर्जना त्याची जोरदार    
आली ती डरकाळी ऐकायला   
कुतूहल मनी प्राण्यांचे तुला   

पक्षी  सरपटणारे  हे प्राणी  
पहातच हिंडलो गात गाणी    
गंमत वाटली, आनंद झाला   
कुतूहल  मनी प्राण्यांचे तुला  


वैशाली वर्तक

गुरुवार, १६ जुलै, २०२०

एकाच छत्रीत दोघे


उनाड वारा साहित्य परिवार भव्य राज्य स्तरीय  काव्य स्पर्धा

विषय-  एकाच छत्रीत  दोघे

चल आहे  छत्री  एक
आला बघ हा पाऊस
एका छत्रीत चालण्याची
पूरी करु आज हौस

डौलदार आहे छत्री
देते पावसात निवारा
ये अजून जवळ अशी
झोंबतो मुजोर वारा

पावसाने दिली संधी
 जवळ येण्याचा बहाणा
कळतय मला  पण सारे
तेवढा तू आहेच शहाणा

पडो असाच पाऊस
चालू जरा दोघे खेटून
कोणी जन  नाही बघत
नको जाउस तू लाजून

एका छत्रीत चालण्याची
आली का नाही गंमत
तेवढाच थोडा वेळ गेला
वाटली तुला पण जंमत

वैशाली  अविनाश वर्तक.
अहमदाबाद (गुजरात)
8141427430





अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा आयोजित
आला पाऊस प्रेमाचा या व्हिडिओ काव्य सादरीकरण स्पर्धेत मी वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद गुजरात मधून सहभागी होत आहे
माझ्या कवितेचे शीर्षक आहे .
..एकाच छत्रीत दोघे



 पहाता पहाता आली सर
सुखावले बघ तन मन
मिळणार नाही अशी संधी
 दवडवू नको एक क्षण 

चल आहे  छत्री  एक.  
आला रिमझिम प्रेमाचा पाऊस 
एका छत्रीत चालण्याची
पूरी करु आज हौस. १

 छत्री आहे डौलदार
 घेऊ तिचाच सहारा
ये अजून जवळ अशी ...२
झोंबतोय मुजोर वारा

मिळता पावसाची संधी 
 जवळीक साधणे हा बहाणा
कळतय मला  पण सारे
तेवढा तू आहेच शहाणा. ३

पडत राहो असाच पाऊस     
चालू जरा दोघे खेटून
कोणीsssss ही  जन  नाही बघत
नको जाउस तू लाजून.      ४

एका छत्रीत चालण्याची
 सांग आली की नाही गंमत
तेवढाच थोडा वेळ गेला
वाटली ना तुला पण जंमत.     ५

प्रीत पावसात अंकुरता
बीजांकुरे फुटे अलवार
*मातीला लागलेले डोहाळे*
पुरविले .पावसाने हळुवार  ६


पाऊस असतोच ग प्रेमाचा
भिजूनी चिंब जाहली धरा
उगा का वाट पहाते  सख्याची
कधी बरसतील वर्षाधारा. ७












विधीलिखीत

रचियता साहित्य मंच आयोजित
भव्य  चौरंगी महा काव्य स्पर्धा 2020
स्पर्धेसाठी
विषय - विधिलिखित           13/7/2020


सामान्यतः असे  वदती जन
जे होते ते असते विधी लिखीत
मग कशाला करायचे प्रयत्न 
व्हायचे ते होणार हे...  खचित

कधी कोणास मिळते चिमूटभर 
तर कोणास मिळते ओंजळभर
ते तर असते विधीलिखीत फळ
तयासाठी लागते सत्कर्माचे बळ

म्हणती वृषभ रास असे भाग्यवान
चुकले का तयांना दुःखाचे पहाड
देवत्व पावूनी पण, कृष्ण अन् रामाला
सुटली नाही  दुःखाच्या नशिबाची पाठ

नैसर्गिक  आपत्तीत दगावतात माणसे
देवाच्या कृपेने तरली जाती लहान अर्भके
तिथे म्हणावे खेळ  विधी लिखीताचा
न करिता सायास जीव वाचविण्याचा

घडायचे ते घडणार ते नाही चुकणार
विश्वास हवा बाहुवर नको हस्त रेखांवर
अन् ठेवावी सदा दृढ श्रध्दा देवावर
मग विधी लिखीताची होते कृपा दृष्टी  आपणावर



वैशाली वर्तक
नोंदणी क्रमांक 189
अहमदाबाद 
गुजरात  स्टेट
8141427330

गीत.... साद मनाची भावगीत

काव्य स्पंदन 02राज्य स्तरीय समूह 
काव्यप्रकार -- भावगीत लेखन
विषय - साद मनाची

तुची असता आमुचा त्राता
घालू कोणाला रे साद आता   .....धृवपद

तू सर्वांचा असशी पालक
तुझे आम्ही अजाण बालक
तुझ्या  कृपेची वाट पाहता
घालू कोणाला रे साद आता

भक्तांचा तू असे कनवाळू
माते सम तू सदा दयाळू
दिन न सरे तुज स्मरता
घालू कोणाला रे साद आता

नयनी आस त्या चरणाची
एकच चिंता ती दर्शनाची
अंत नको पाहू भगवंता
घालू कोणाला रे साद आता

तूची असता आमुचा त्राता
घालू कोणाला रे साद आता

वैशाली वर्तक

बुधवार, १५ जुलै, २०२०

अष्टाक्षरी वाट पहावी चंद्राने

मोहरली लेखणी समूहआयोजित
अष्टाक्षरी काव्य
विषय- वाट पहावी चंद्राने

रोज येते अगोदर
नभी तयास बघून
शशी आला का पाहते
वाट पाहते लाजून

गर्दी  नभात मेघांची
होते दुर्लभ दर्शन
खंत करिते मनात
मनी दाटे आकर्षण

चंद्र चांदण्यांचा चाले
खेळ नभी लोभनीय
रुप खुले चंद्रासवे
चांदणीचे रमणीय

रोज येतीच चांदण्या
तरी ओढ वाटे मनी
वाट पहावी चंद्राने
मेघ दाटिलेल्या क्षणी

पौर्णिमेच्या त्या रातीला
दिसे नक्षत्रांचे देणे
वाट पहावी चंद्राने
करुनिया नभी येणे
वैशाली वर्तक


गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...