बुधवार, ३१ जुलै, २०२४

रित्या मनाचा गाभारा \ पुण्य


 पुण्य.  19/11/24.   पुन्हा post केली 


जन्म मिळाला मानव
मेंदू केलाय बहाल
करु जीवन  सार्थक
पाहू जगाची कमाल

गोळ्या समान मातीच्या
मन  होते निर्वीकार
 केले संस्कार  मातेने
होउनिया  शिल्पकार 

रिता मनाचा गाभारा
सजे मोहाने मायेने
जसे वाढे वयमान
भरे तो  सहजतेने  

 सुख   भोगिले भौतिक
येता काळ यौवनाचा
मन आनंदे  भरले
भरे गाभारा मनाचा

मन  जाहले संतृप्त
 येता सांज आयुष्याची
आशा  आकांक्षा नुरली
करु  जाणीव देवाची 

धरी कास अध्यात्माची
मिळविले  समाधान
रित्या मनाच्या गाभा-या
उमजले भाग्यवान

वैशाली वर्तक
अहमदाबाद





कल्याण डोंबिवली महानगर २
आयोजित
उपक्रम
विषय...पुण्य

जसे मानव घेतो जन्म
सुरु होते करणे कर्म
चांगलं वाईट करी कामे
त्यातच दडले जीवन मर्म

जसे होतेची सत्कृत्य
देवमाणूस येती शब्द अधरी
वृध्दी चांगल्या कामांची होता
पुण्य पडते पदरी
 

पहा कामगार जन
केले देव काम कोरोनात
जोडीला नर्स डाॕक्टरांनी
केली सेवा रूग्णांची समाजात


संतानी करुनी सजाण
दिले ज्ञान सामान्य  जनास
दिले बोधक विचार ज्ञान
उमजण्या  पुण्य कर्मास


वैशाली वर्तक 
अहमदाबाद



काव्य निनाद साहित्य राष्ट्रीय मंच पुणे 
विषय.  खोल मनाच्या अंगणी

 *मनाच्या गाभाऱ्यात* 

रिता मनाचा गाभारा
सजे मोहाने मायेने
जसे वाढे वयमान
भरे तो  सहजतेने  

 असे मातीचाच गोळा 
 संस्कार  रूजती मनी 
दूर राखण्या षडरिपु
  खोल मनाच्या अंगणी 

 धरा कास अध्यात्माची
मिळवावे  समाधान
रित्या मनाच्या गाभा-या
  उमजे स्वतः. भाग्यवान

  
 माणुसकी, सौजन्याने 
  असावा वहाणारा  झरा
  मनाच्या अंगणी सदा
 जीवनात कामी येतो खरा 

   मनाच्या  या अंगणात 
  जाण ठेवावी  देवाची
नित्य आठवण हवी
मनी त्याच्या चरणांची

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

व्यसनाला आळाघाला

मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र 
आयोजित 
उपक्रम दि 29/7/24
प्रकार पारंपरिक 
विषय ...व्यसनाला आळाघाला
शीर्षक ..सुदृढ सशक्त भारत

नका जाऊ आहारी व्यसनाच्या
सेवावे सात्विक अन्नपाणी
वाईट गोष्टी त्यजता शरीरास
येणार नाही आणीबाणी 

व्यसनाधीन होणं वाईट
 करी घरादाराची रांगोळी 
 हवा सदैव मनावर काबू 
 मग सुखाच्या गाऊ ओळी

 
 गडक-यांनी दिला संदेश जनांना
 चांगली माणसे असती भवती
आठवा एकच प्याला ची  नायिका
व्यसन मुक्त असता होते प्रगती .


बनेल सृदृढ सशक्त भारत
 शिकवण दिली पूर्वजांनी 
संभाळून जतन करावी
हीच धुरा पुढच्या युगानी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, ३० जुलै, २०२४

मनाचा हळवा कोपरा आंगण

शब्द शिल्प कलाविष्कार संघ 
आयोजित उपक्रम 
 विषय...मनाचा हळवा कोपरा 
 शीर्षक.. माझे अंगण

  रोज आवडे मजला
  माझ्या  अंगणी बसणे  
  वाटे कितीही बसले
तरी समाधान नसणे

 एक एक चहाचा घोट
घेते बसून खुर्चीवर
कानी येते किलबिल 
भासे गोड क्षणभर 

 दावित तिची चपळता
जाई मधूनच  खार
एका बाजूला मी गुंफते 
अंगणातल्या फुलांचे हार

मंद झुळूक वाऱ्याची 
मनाला असते सुखावत
सकाळची भक्ती गीते 
ऐकून मन माझे रमवत

अशी रम्य सकाळ 
वाटे कधी न संपावी 
अशातच सहजची
 मम लेखणी झरावी .


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, २८ जुलै, २०२४

अष्टाक्षरी. कटु पण सत्य अनुभव


*स्पर्धेसाठी* 
मोरणा कवी कट्टा समूह सांगली, पश्चिम महाराष्ट्र 
आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा.
दि २८\७\२४
विषय ..कटु सत्य अनुभव 
शीर्षक..  सद्य जीवनशैली 

जग झालय प्रगत
एक फोन केला तर
 मिळे सारेची सहज
हवी ती वस्तू  हजर

सध्या मित्रांची गणना
किती करावी, ती कमी 
पण गरजेच्या वेळी 
कामी येण्याची न हमी

बोलण्यास भेटण्यास 
वेळ नसे कोणालाही 
फोनवरच्या संवादी
आनंदाची मजा नाही

दोन शब्द बोलायला 
आजी आजोबा तृषित
एका घरात  राहून 
सदासाठी उपेक्षित 

पुढे मागे मोठी  बाग
असे  घर शानदार 
 सुख उपभोग घेण्या 
वेळ कोणा नाही फार

येती मनात विचार 
असे आहे हेची सारे
कटु आहे पण सत्य
वरवर दिसे न्यारे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
८१४१४२७४३०

शनिवार, २७ जुलै, २०२४

परंपरा

 परंपरा


जुन्या चालीरीती रिवाज

पुढे चालवणे ही परंपरा 

जतन करणे  संस्कृती ला

हीच शिकवण मनी धरा.  १


 रुढी चालीरीती  परंपरांचे

  करतोय आपण जतन

भारतीय संस्कृती  आपुली

आहे   अति पुरातन.    २


साजरे करितो सणवार उत्सव 

 दिसते तयातून रूढी परंपरा

उत्सवातून दिसे समाजप्रेम

 समतेची ध्वजा हाती धरा. ३


किती वर्णावी परंपरेची गाथा

येथेच जन्मले संत, वीर महान

अन् अंतराळात जाणारे शास्त्रज्ञ 

काय सांगावी परंपरेशची शान.  ४


अशी महान परंपरा  भारतीय

असावा मनी सदा अभिमान

साहित्य , कला, क्रिडा ,संगीतात

एक एक चमकते तारे महान.      ५



जुन्या रिती रिवाजात

सामाजिक   करुन बदल

नव्या रितींचे अनुसरण केले

 हे घडले ते ही नवल.             ६



सण वार पारंपारिक 

होतात देशभर साजरे

  होता संस्कार  संस्कृतीचे जतन

दिसती सर्वत्र चेहरे हासरे.            ७



लाभलाय आपल्याला

भक्ती रस साहित्याचा 

 संत वाणीचा वारसा

तोची अमुल्य ठेवा परंपरेचा.  ८


गुरुवार, २५ जुलै, २०२४

अष्टाक्षरी. कर्तव्याच्या पथावर जीवनाच्या पथावर

*स्पर्धेसाठी*


काव्य पुष्प साहित्य मंच आयोजित 
55व्या पाच दिवसीय राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा 
25/7/24
विषय... कर्तव्याच्या पथावर
शीर्षक.. जाण कर्तव्याची 
...........................
संपताच बालपण 
येते जाण कर्तव्याची 
ऋण असे पालकांचे
ठेवू ध्यानात सदाची.   


समाजात वावरतो
त्याचे पण, देणेकरी 
समाजोपयोगी राहू
कर्तव्याच्या पथावरी

जीवनात निरंतर 
कर्तव्यांची असे रांग
निसर्गाचे संवर्धनी
स्मरावे फेडण्या पांग

स्वच्छ देश अभियान 
मंत्र ठेवूनी ध्यानात 
आत्मनिर्भरता हवी
बलशाली  करण्यात 

देहातून देवाकडे 
जाता मधे लागे देश
देशभक्ती हवी याचा
मनी ठेवावा संदेश

अशी मौलिक कर्तव्ये 
जरी वाटे खडतर
पाळावीत जीवनात 
कर्तव्याच्या पथावर

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, २४ जुलै, २०२४

अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे




वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई 

*स्पर्धेसाठी
मनस्पर्शी स्पर्धा समूह 
मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित स्पर्धा 
5व्या वर्धापन दिनानिमित्त निमित्ताने 
विषय.. *अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे*

अभिमानी नसावे कधीच 
स्व चा अभिमान असावा
भेद जाणू स्वाभिमानी ,अभिमानी
गर्विष्ठ  कधीच  स्वभाव नसावा .



असता स्वभावे स्वाभिमानी
 तयाचाच मान रहातो जगती 
 ताठ मानेने जगणे उचित 
तरच होते जीवनी प्रगती.

अभिमानी नसावे कधीच
गर्वाने   होतो पराजय
बलाढ्य असूनही रावण
मिळवू शकला नाही विजय.

मोडेन, पण नाही वाकणार 
 स्वाभिमानी वृत्ती असावी 
 विनयाने शोभावे जीवनी
पण, लाचारता कधी नसावी.

*अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे*.
याची द्यावी  मनाने  ग्वाही 
मग यश संपादन करण्यात 
कधीच  अडचण येणार नाही.


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
8141427430

चित्र काव्य करू हितगुज

शब्द रजनी साहित्य समूह पुणे  चित्र काव्य  अष्टाक्षरी  शीर्षक  ... करु हितगुज  हात  हातात घेतला जाऊ समुद्र  किनारी मौज लाटांची पहात बसु बाळुत...