पुण्य. 19/11/24. पुन्हा post केली
जन्म मिळाला मानव
मेंदू केलाय बहाल
करु जीवन सार्थक
पाहू जगाची कमाल
गोळ्या समान मातीच्या
मन होते निर्वीकार
केले संस्कार मातेने
होउनिया शिल्पकार
रिता मनाचा गाभारा
सजे मोहाने मायेने
जसे वाढे वयमान
भरे तो सहजतेने
सुख भोगिले भौतिक
येता काळ यौवनाचा
मन आनंदे भरले
भरे गाभारा मनाचा
मन जाहले संतृप्त
येता सांज आयुष्याची
आशा आकांक्षा नुरली
करु जाणीव देवाची
धरी कास अध्यात्माची
मिळविले समाधान
रित्या मनाच्या गाभा-या
उमजले भाग्यवान
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कल्याण डोंबिवली महानगर २
आयोजित
उपक्रम
विषय...पुण्य
जसे मानव घेतो जन्म
सुरु होते करणे कर्म
चांगलं वाईट करी कामे
त्यातच दडले जीवन मर्म
जसे होतेची सत्कृत्य
देवमाणूस येती शब्द अधरी
वृध्दी चांगल्या कामांची होता
पुण्य पडते पदरी
पहा कामगार जन
केले देव काम कोरोनात
जोडीला नर्स डाॕक्टरांनी
केली सेवा रूग्णांची समाजात
संतानी करुनी सजाण
दिले ज्ञान सामान्य जनास
दिले बोधक विचार ज्ञान
उमजण्या पुण्य कर्मास
वैशाली वर्तक
अहमदाबाद
काव्य निनाद साहित्य राष्ट्रीय मंच पुणे
विषय. खोल मनाच्या अंगणी
*मनाच्या गाभाऱ्यात*
रिता मनाचा गाभारा
सजे मोहाने मायेने
जसे वाढे वयमान
भरे तो सहजतेने
असे मातीचाच गोळा
संस्कार रूजती मनी
दूर राखण्या षडरिपु
खोल मनाच्या अंगणी
धरा कास अध्यात्माची
मिळवावे समाधान
रित्या मनाच्या गाभा-या
उमजे स्वतः. भाग्यवान
माणुसकी, सौजन्याने
असावा वहाणारा झरा
मनाच्या अंगणी सदा
जीवनात कामी येतो खरा
मनाच्या या अंगणात
जाण ठेवावी देवाची
नित्य आठवण हवी
मनी त्याच्या चरणांची
वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा