शनिवार, २७ जुलै, २०२४

परंपरा

 परंपरा


जुन्या चालीरीती रिवाज

पुढे चालवणे ही परंपरा 

जतन करणे  संस्कृती ला

हीच शिकवण मनी धरा.  १


 रुढी चालीरीती  परंपरांचे

  करतोय आपण जतन

भारतीय संस्कृती  आपुली

आहे   अति पुरातन.    २


साजरे करितो सणवार उत्सव 

 दिसते तयातून रूढी परंपरा

उत्सवातून दिसे समाजप्रेम

 समतेची ध्वजा हाती धरा. ३


किती वर्णावी परंपरेची गाथा

येथेच जन्मले संत, वीर महान

अन् अंतराळात जाणारे शास्त्रज्ञ 

काय सांगावी परंपरेशची शान.  ४


अशी महान परंपरा  भारतीय

असावा मनी सदा अभिमान

साहित्य , कला, क्रिडा ,संगीतात

एक एक चमकते तारे महान.      ५



जुन्या रिती रिवाजात

सामाजिक   करुन बदल

नव्या रितींचे अनुसरण केले

 हे घडले ते ही नवल.             ६



सण वार पारंपारिक 

होतात देशभर साजरे

  होता संस्कार  संस्कृतीचे जतन

दिसती सर्वत्र चेहरे हासरे.            ७



लाभलाय आपल्याला

भक्ती रस साहित्याचा 

 संत वाणीचा वारसा

तोची अमुल्य ठेवा परंपरेचा.  ८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...