बुधवार, १७ जुलै, २०२४

विठूराया.(.6).. विठू तव चरणाशी |पांडुरंग|||. विठ्ठलाचा नाद|, दर्शन घेता तुझे पांडुरंगा.



शोध अस्तित्वाचा साहित्य मंडळ आयोजित 
विषय.. विठू तुझ्या चरणाशी विठू तुझ्या चरणाशी 
शीर्षक.. विठू वसे अंतरी

तुझ्या नाम स्मरणाचा
मना लागलासे छंद 
भासे भक्तीतच शक्ती 
लाभे आगळा आनंद 

सदा तव नाम ओठी
तूची श्वास  अंतरीचा 
कुठे शोधू विठू राया
‍ध्यास तुझ्याची भेटीचा 

ध्यानी मनी स्वप्नी मज
तूच दिसे सदाकाळ
विठू तुझ्या स्वरुपाने
झाली सुखद सकाळ.      


.मुखी घेता तव नाम
विसरते देहभान
 कुठे शोधु विठूराया 
गाते तव गुणगान

नाम स्मरणात असे 
अनामिक दृढ शक्ती 
नका  शोधू विठुराया 
करा मनोभावे भक्ती.




रूप वसले लोचनी
भासे कृपेची साऊली
युगे अठ्ठावीस ऊभा
मी माझी विठ्ठल माऊली



     येता वारी पंढरीला..
 झाली घाई दर्शनाची  
पाहियली हरी मूर्ती. 
 काढा दृष्ट विठ्ठलाची



वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद





काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
देवशयनी एकादशी निमित्ताने 
भव्य राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा 
*स्पर्धेसाठी*
१७\७\२४
विषय पांडुरंग पांडुरंग 
शीर्षक... आस वैशालीची


विठ्ठल  सावळा ।उभा विटेवरी    ।
चंद्रभागे तीरी    ।     *पांडुरंग*    ॥        १

गोजीरे  ते रुप ।बघते मी डोळा  ।
येतसे  उमाळा ।अंतरात  ॥            २

राहो सदा मुखी  । पांडुरंग नाम  ।
हेची कर्म काम  ।सदाकाळ ॥           ३

उठता बसता  । स्मरते तुजला  ।
तारण्या मजला  ।तुच देवा ॥             ४

कसे वर्णू गुण |माझी अल्पमती 
तव नाम चित्ती  । ठेवीतसे॥               ५

सावळ्या विठ्ठला  ।दाटे मनी  खंत  ।
पाहू नको अंत  ।  विनवीते ॥              ६

दिंडीत भासतो ।मी तू चा अभाव ।
समतेचा भाव । चोहीकडे ।|ग               ७

हेची दान दे गा ।आले मी शरण  ।
दाखवा चरण । मजलागी. ॥                 ८

मनी एक आस  ।दिंडीत जाण्याची ।
दर्शन घेण्याची।   वैशालीची॥                ९

वैशाली वर्तक 
अहमदाबाद गुजरात 
८१४१४२७४३०

शब्दरजनी  साहित्य समूह 
आयोजित 
अष्टाक्षरी काव्यलेखन 
विषय .       .. मनी विठ्ठलाचा नाद 
  शीर्षक...भेटीसाठी आतुर 

येता जवळ आषाढ 
ध्यानी मनी विठुराया 
जाऊ चला पंढरीला 
 देई  तो प्रेमाची छाया

मनी रंगविले  स्वप्न 
माऊलींच्या भेटीसाठी 
नाही तमा पावसाची 
 विठु आहे सदापाठी

गजरात सदा दंग 
जयघोष विठ्ठलाचा
मिळे परम आनंद 
 श्रीहरीच्या भजनाचा

एक पाही दुसऱ्यात
दिसे विठ्ठलाची मूर्ती 
असा समतेचा भाव
अशी वारीची ही किर्ती 

लागे भक्तांनाही ध्यास 
*मनी विठ्ठलाचा नाद* 
मन भक्तीत रंगता
मिळे तसा प्रतिसाद 

नाचू गाऊ होऊ दंग 
दुम दुमेल पंढरी
डोळाभर दर्शनाने
  मन संतृप्त अंतरी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच अमरावती 
आयोजित उपक्रम १४६
दि १८\७\२४
विषय.  दर्शन घेता तुझे पांडुरंगा
शीर्षक   आनंदाश्रू वाही लोचनी

  
उठता बसता स्मरते तुजला
होती एकची नाम ओठांवरी
तव दर्शनाचा ध्यास लागला
तुची कर्ता करविता  निरंतरी


वारीत जयघोष चाले नामाचा
वैष्णवांचा मेळा होता संगती 
जो तो एकमेकात पाही विठ्ठल 
सारे आतुरतेने पावले चालती 

दिसता रे  मंदिराचा कळस
घाई मनी आता दर्शनाची
 पूरी  होईल आता मनीषा 
तव रुप निजडोळा पहाण्याची

सुंदर तव रुप पाहूनिया
दर्शन घेता तुझे पांडुरंगा 
कर कटीवर, गळा तुळशीमाळ
  लोचने आनंदाने वाहे अश्रू-गंगा.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

5 कुठे शोधु विठुराया* अष्टाक्षरी 

कोठे शोधू विठूराया 


तुझ्या नाम स्मरणाचा

मना लागलासे छंद 

भासे भक्तीतच शक्ती 

लाभे आगळा आनंद 


सदा तव नाम ओठी

तूची श्वास  अंतरीचा 

कुठे शोधू विठू राया

‍ध्यास तुझ्याची भेटीचा 


ध्यानी मनी स्वप्नी मज

तूच दिसे सदाकाळ

विठू तुझ्या स्वरुपाने

झाली सुखद सकाळ.      


.मुखी घेता तव नाम

विसरते देहभान

 कुठे शोधु विठूराया 

गाते तव गुणगान


नाम स्मरणात असे 

अनामिक दृढ शक्ती 

नका  शोधू विठुराया 

करा मनोभावे भक्ती


रूप वसले लोचनी

भासे कृपेची साऊली

युगे अठ्ठावीस ऊभा

 माझी विठ्ठल माऊली


 येता वारी पंढरीला..

 झाली घाई दर्शनाची  

पाहियली हरी मूर्ती. 

 काढा दृष्ट विठ्ठलाची


वैशाली अविनाश वर्तक

अहमदाबाद 



शब्दरजनी  साहित्य समूह 

आयोजित 

अष्टाक्षरी काव्यलेखन 

6विषय ...मनी विठ्ठलाचा नाद 

  शीर्षक...भेटीसाठी आतुर 


येता जवळ आषाढ 

ध्यानी मनी विठुराया 

जाऊ चला पंढरीला 

 देई  तो प्रेमाची छाया


मनी रंगविले  स्वप्न 

माऊलींच्या भेटीसाठी 

नाही तमा पावसाची 

 विठु आहे सदापाठी


गजरात सदा दंग 

जयघोष विठ्ठलाचा

मिळे परम आनंद 

 श्रीहरीच्या भजनाचा


एक पाही दुसऱ्यात

दिसे विठ्ठलाची मूर्ती 

असा समतेचा भाव

अशी वारीची ही किर्ती 


लागे भक्तांनाही ध्यास 

*मनी विठ्ठलाचा नाद* 

मन भक्तीत रंगता

मिळे तसा प्रतिसाद 


नाचू गाऊ होऊ दंग 

दुम दुमेल पंढरी

डोळाभर दर्शनाने

 झाले संतृप्त अंतरी


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

सिध्द  साहित्यिक  समूह

आयोजित  उपक्रम क्रमांक ४४६

विषय -विठू नामाचा गजर .   विठू नामाचा गजर 

अष्टाक्षरी


     *हरी नामाचा गजर*


वारी निघाली पंढरी

विठु नाम ओठावरी

हरी भक्तीत न्हाहती

वारकरी निरंतरी


जय हरी विठ्ठलाचा

एकादशी  आषाढीला

नाम गजर करिता

चला जाऊ पंढरीला


विठ्ठलाच्या गजरात

 वारकरी होती गोळा

घेता दर्शन विठुचे

वाहे आनंदाश्रू डोळा


नाम स्मरणात असे

अनामिक दृढ शक्ती 

दूर   होती भवताप

करा मनोभावे भक्ती


झेंडा रोवतील तीरी

हरी नाम गजरात

दुम दुमेल पंढरी

विठ्ठलाच्या भजनात


वैशाली वर्तक 

अहमदाबाद



तव नामाचा महिमा 

जाणियला सदासाठी

दिसे तू मज अंतरी

उभा राही माझ्या पाठी


घेता नाम रात्रंदिन 

लागे अंतरीचा दिवा

तुझ्या नामाचा गोडवा 

वेड लावी सदा जीवा


करी दुःख सारे दूर 

विठू नामाचा गजर 

देई मनाला आनंद 

पडे दुःखाचा विसर


विठू नामाचा गजर 

चाले सदा वाळंवंटी

उभा पहा पांडुरंग 

कर ठेवोनिया कटी


पाहियला पांडुरंग 

नित्य नाम घेता मुखी 

होता नामाचा गजर 

सारं जन होते सुखी




&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&

###रूप सावळे सुंदर

       *माझा विठुराया*


माझ्या  विठ्ठलाचे पहा

रुप सावळे सुंदर 

भान माझे हरपते

वाटे पाहू निरंतर                 1


भाळी उटी चंदनाची

गळा तुळशीच्या माळा

कर कटी वरी  शोभे

दाटे पाहता उमाळा                 2


कानी कुंडले शोभती

मुख भासे ते सुंदर 

कटी शोभे  पितांबर

मना भासे मनोहर            3


रुप तुझे आवडीचे

सदा नयनी ठसते

डोळा भरुनी सदैव

चित्तातून मी पाहते        4


*रुप सावळे सुंदर* 

आता  दाखवा चरण

कधी देशील दर्शन  

आले तुजला शरण            5


वैशाली वर्तक 

अहमदाबाद



मंगळवार, १६ जुलै, २०२४

आता असेच जगायचे

 काव्य निनाद साहित्य मंच पुणे 

आयोजित उपक्रम 

दि 15/7/24

विषय.  आता असेच जगायचे 




 आता असेच जगायचे 


मिळालाय मानव जन्म 

करू सार्थक जीवनाचे

नको कधीच विचार मनी

*आता असेच जगायचे* 


 आहे सुंदर हे आयुष्य 

 कशाला होता निरूत्साही

 झटका मरगळ मनीची

 निशे नंतर ऊषा येते सदाही


बाल्य तारुण्य वार्धक्य 

असती टप्पे जीवनी तीन 

बागडण्यात, कर्तृत्वात ,

 अन् नामस्मरणात होऊ लीन


 आता असेच जगायचे 

 नको कदा  सूर निराशाचे 

 रोज सकाळ  येते घेऊन

किरण नव्या -दिशा आशाचे


व्हायचे तेच होणार 

नको चिंता कदा मनी

जायचे ते अचूक जाणार

मंत्र हाची ठेवासदा ध्यानी


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

बुधवार, १० जुलै, २०२४

लोक काय म्हणतील


काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक ४८३
विषय. लोक काय म्हणतील?
 शीर्षक. .. मनाचेच करतो म्हणतील 
. लोक काय म्हणतील?
 

नको मनात विचार 
करा,  'मनी जे उचित' 
लोक काय म्हणतील ?
नको विचार खचित 

सदा ऐकावे जनांचे
अशी म्हण ऐकीवात
पण करावे मनाचे
हेही आहे कथनात .

मत विचार  ऐकणे
होते कामाला सुलभ
मिळे कल्पनेची माळ
नुरे शंकेचे मळभ.

खरा ठरे तोची जगी
ऐकूनिया जगताचे.  
*लोक बोलेनात काही* 
 स्वतः ठरवी , स्वतःचे 

व्यक्ती तितक्या प्रकृती 
विचारात मतभेद 
हवे तेवढे ऐकावे
नको मनी कदा खेद.

ठाम दृढनिश्चयाने
करा , स्वतःच्या मनाचे
होता यशस्वी कामात 
मन हर्षे -मोदे नाचे.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, ९ जुलै, २०२४

ओल्या मातीचा सुगंध



साहित्य दर्पण कला मंच नागपूर 
आयोजित उपक्रम क्रमांक २२२
विषय..ओल्या मातीचा सुगंध 
  शीर्षक..आसमंती दरवळ

काळ्या मेघांचे आभाळ 
  सोसाट्याचा  वारा वाहे 
लागे चाहुल पक्षांना
  बळीराजा नभी पाहे

शिवारात काळी माती
 होती तप्त भेगाळली
बरसता मृग सरी
तृप्त माती संतोषली.

भेटताच तिचा सखा
 आनंदली वसुंधरा
ओल्या मातीचा सुगंध 
 पसरवी मंद वारा

ओल्या मातीचा सुगंध 
करे प्रसन्न मनाला 
कसा ओला ओला वास
हवा हवासा वाटेजनाला

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

वृध्दापकाळ

साहित्य दर्पण कला मंच नागपूर 
आयोजित 
काव्य लेखन 

विषय..वृध्दापकाळ

ऊषा दुपार व निशा
विभागला सदा दिन
बाल्य तारुण्य वार्धक्य 
आयु अवस्थाही तीन 

सरे मजेत बालपण 
जवाबदारी  पेलता तारुण्य
पण कठीणता भासते
वार्धक्य असे कारूण्य

शरीर असते थकलेले 
मन मानायला नसे तयार
 सतत  उजळणी भुतकाळाची
मग वाद विवाद अपार 

 न करावे   सल्ला सूचन
आपण आपल्यात रहावे
चिंतन वाचन छंद कला
याला मात्र जोपासावे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बटवा पाकिट

सर्वधर्मसमभाव लोकशाही साहित्य मंच 
आयोजित काव्यलेखन उपक्रम 
विषय ..बटवा \पर्स

बटवा हा गरजेचा
हवा सदा हाता जवळ
पैशा शिवाय  कसे होणार 
तोच संभाळणे काम केवळ

असती त्यांची नावे अनेक 
मनी बँग ,पर्स ,बटवा, पाकिट
काम एकच असे तयाचे
पैसाअडका ठेवणं सुरक्षित 

 नजरेत येतो ,बटवा म्हणता,
 घरची डॉक्टर वाटणारी आजी,
जरा बरं नाही समजता
सोडून येई चिरत असलेली भाजी

 भरपूर जडी बुकीटींनी भरलेला
 होता पोट दुखी , डोकेदुखी 
लगेच काढून देई बटव्यातूनी
आजार दूर सारून, करी सुखी 

आत काळ बदलला 
पर्स मधे नसतो पैसा सहज
प्लास्टिक पैसा झाल्याने
 विविध कार्डे पुरवितो  गरज 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अष्टाक्षरी. जीव शिणला शिणला

सिध्द साहित्यिक समूह 
उपक्रम क्रमांक ५६१
विषय ... जीव शिणला शिणला 
 शीर्षक ...धडपड जगण्याची 

जीव  येताची जन्मास
 धडपड  जगण्याची 
सुरू  प्राणी मात्रातून
दिसे  ती  निरंतराची

 मेंदू केलाय बहाल
 ईश्वराने मानवाला 
देतो नवीन कल्पना 
प्रतिदिनी जगण्याला 

आयुष्यात धडपड
चालते जीवन भर
म्हणून दिसे प्रगती
जीवनात निरंतर

रोज नवे आविष्कार 
नाही निवांतेचा क्षण
*.जीव शिणला शिणला* 
म्हणतसे सदा मन


सुख, शांति मिळविता
क्षणभर न उसंत 
नाही मिळाला निवांत   
मनी राही सदा खंत

आहे  जीवात जीव
हेच  वदे सदाकाळ 
जीव शिणला म्हणत 
होते उद्याची सकाळ
 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...