बुधवार, १० जुलै, २०२४

लोक काय म्हणतील


काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक ४८३
विषय. लोक काय म्हणतील?
 शीर्षक. .. मनाचेच करतो म्हणतील 
. लोक काय म्हणतील?
 

नको मनात विचार 
करा,  'मनी जे उचित' 
लोक काय म्हणतील ?
नको विचार खचित 

सदा ऐकावे जनांचे
अशी म्हण ऐकीवात
पण करावे मनाचे
हेही आहे कथनात .

मत विचार  ऐकणे
होते कामाला सुलभ
मिळे कल्पनेची माळ
नुरे शंकेचे मळभ.

खरा ठरे तोची जगी
ऐकूनिया जगताचे.  
*लोक बोलेनात काही* 
 स्वतः ठरवी , स्वतःचे 

व्यक्ती तितक्या प्रकृती 
विचारात मतभेद 
हवे तेवढे ऐकावे
नको मनी कदा खेद.

ठाम दृढनिश्चयाने
करा , स्वतःच्या मनाचे
होता यशस्वी कामात 
मन हर्षे -मोदे नाचे.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...