बुधवार, २० मार्च, २०२४

आयुष्याची जमापूंजी

सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम क्रमांक ३२३
विषय ..आयुष्याची जमापूंजी

शिकवण  दिली बालपणी
करण्या जमा पूंजी विद्येची 
भविष्य घडेल उद्याचे
जवळ असता पूंजी ज्ञानाची

थेंबे थेंबे पाणी साठे
जमा करा पूंजी धनाची
आई बाबा सदा वदती
काळजी त्यांना भविष्याची

सरकारच्या  विविध योजना
  करण्या सुखी निवृत्ती जीवन
पैसा जमवून निधी जमवा
मस्त राहिलं आनंदी मन

लक्ष्मी तर हवीच जीवनी
दिसतो तिचा  तोरा वेळोवेळी 
जीवनी सत्कर्माची पण पूंजी 
 कामी येते आयु सरते वेळी

 मान सन्मान मिळावा जीवनी
  उज्वल दावूनी कर्तृत्व 
  व्यक्तिमत्वाचा  दाखवा ठसा
आयुष्याच्या पूंजीत त्यांचे महत्त्व 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

v. मळभ

 अ भा म सा प ठाणे जिल्हा 2

उपक्रम काव्य रचना

14/5/22

विषय - मळभ



जागे झाले झोपेतून

  स्वप्न  पाहूनी भयंकर

 मन धावे सैरावैरा

  वाईट विचार क्षणभर


 उगा का म्हणती जन

मन चिंती , न वैरी  चिंती

 तशी  झाली माझी  स्थीती

न उमजे करण्या कृती


मनाच्या आभाळी आले

अनेक शंकांचे मळभ

 मनी    दाटले काहूर

उमजे ना विचार  सुलभ


हात जोडूनी देवाला

मन लावले  नामस्मरणात

शांत चित्ते बसता देवा जवळी

विसर पडला विचारात 


सरले शंकेचे मळभ

यावी सर पावसाची

निरभ्र मन आभाळ

विरली दाटी विचाराची


वैशाली वर्तक 

अहमदाबादमळभ

रविवार, ३ मार्च, २०२४

समाधान

अ भा म सा परिषद समूह 2
उपक्रम
  विषय - समाधान

असावी वृत्ती  समाधानी
संतवाणी सांगे सदाकाळ
मनी असावा संतोष
नाही होत दुःख  कदा काळ

 आहे पैसा आडका मुबलक
पण नसे मनी समाधान
नुरते किंमत त्या धनाची   
संतोष हेच  खरे वरदान

  मिळाले जे आपणास 
मानावे समाधान जीवनी
 नसता हव्यास मनी
  मिळते  सुख मनोमनी

  दास रामांचे  मनाचे श्लोक
देती   हीच शिकवण 
स्वभावात वृत्ती  समाधानी
 करी  सुखाची साठवण


वैशाली वर्तक

मी कशाला पहाते दर्पण

 मी कशाला आरशात पाहू*




सकाळी करिते देव दर्शन

त्यासाठी पहाते आरशात

निहाळते मी स्व मुख

कारण ,...म्हणे देव वसे अपुल्याच अंतरात


देव दर्शन घेण्यास 

रुप पहाणे दर्पणात

हाची उद्देश असे माझा

मग आलेच  ना पहाणे  आरशात.


आरसा दाखवी गुण दोष

देतो सदा तयाचे मत प्रांजल

 न वाढविता वा कमी करिता

आवडे पहाया मला रुप सोज्वल


टापटीप नेटके पणा हवाच

मग आरसाच येतो कामास 

 आरशात पहाणे आलेच ओघाने

  दाखवितो रुप आपणास 


दिले देवाने सुरेख  सृदृढ तन

  तया नीट नेटके राखण्या

जसे व्यायाम असे जरुरी

 हवा दर्पण सौंदर्य तनाचे  पाहण्या


वैशाली वर्तक

भाषा प्रेमाची.... अष्टाक्षरी/ काव्य बत्तीशी /प्रेम मुक्तछंद। प्रेम माची गाडी


अष्टाक्षरी  काव्य
भाषा प्रेमाची                7/2/2019

भाषा नसते प्रेमाला
भावनांचा असे खेळ
सारे कळे न वदता
जमे जीवांचा जो मेळ

शब्दाविणा समजते
गुज मनीचे क्षणात
प्रेम म्हणती तयाला
भाव उमजे मनात

भाव असता उत्कट
नसे गरज बोलणे
माझे प्रेम तुझ्यावरी
शब्दा शिवाय कळणे

आहे माध्यमे प्रेमाची
स्पर्श , संकेत , कटाक्ष
भाव दावी अंतरीचे
प्रेम भाषेत चाणाक्ष

होता असाच प्रेमाचा
स्पर्श कधी ओझरता
क्षणभर नकळत
शब्द न, ते पाझरता

अशी भावना प्रेमाची
निसर्गात भरलेली
पाखरांना कुठे बोली
तरी प्रीत झरलेली. .

.....वैशाली वर्तक




*******************************
***प्रकार काव्यबत्तीशी**
*********-*******************
प्रणय  9/7/9/7

नसते भाषा प्रणयाला  
भावनांचा   तो  खेळ
सारे कळे न वदताच
जमे जीवांचा मेळ

नसता शब्द समजते
गुज सारे क्षणात
प्रणय  म्हणताती जन
भाव कळे मनात

भाव असताची उत्कट
नुरते ते बोलणे
माझे प्रणय तुजवरी
शब्दा विना कळणे

आहे माध्यमे प्रणयाची
स्पर्श खुणा कटाक्ष
भाव दावण्या अंतरीचे
प्रेमात ते चाणाक्ष

होता असाची प्रणयाचा
स्पर्श तो ओझरता
क्षणभर ही नकळत
शब्दही न बोलता

अशी प्रणयाची भावना
निसर्गी भरलेली
पाखरांना कुठली बोली
प्रीत ती झरलेली


वैशाली वर्तक

..............

अ भारतीय ठाणे जिल्हा समूह १
आयोजित उपक्रम क्रमांक ७१७
 विषय ..संकेत मिलनाचा 


संकेत असे महत्त्वाचा
सदा प्रेमाच्या जगात 
निव्वळ खूणा खाणांनी
गुज कळे प्रणयात 

उगा का लेखणी वदते
नको भडिमार शब्दांचा
तृषित आहे तुझ्या दर्शनाला
 विसरु नको संकेत  मिलनाचा

अशी भावना प्रेमाची
निसर्गात पण भरलेली
पाखरांना कुठे बोली
तरी प्रीत झरलेली. .


कटाक्षाने डोळे बोलतात
घायाळ करित क्षणाला
क्षणार्धात भावना उमजती
मिलन घडे वचनाला


वैशाली वर्तक
अहमदाबाद







गाली गुलाब फुलले






सिध्द  साहित्यिका समुह
विषय -- गाली गुलाब फुलले
      

वाट तुझी पहाण्याची
वेड्या मनाची ही रीत
बघ सांजवेळ झाली
सख्या धुंद  झाली प्रीत

होता नजरा नजर
गाली गुलाब फुलले
उगा पाहता दर्पणी
मन माझे आनंदले

येता समीप सखया
अनुराग भरे ऊरी
गाली गुलाब फुलले
प्रीत  गंधित अंतरी

बघ झुकल्या पापण्या
मन तुझ्यात गुंतले
वेड लागले जीवास 
गाली गुलाब फुलले

प्रीत  अबोल जाहली
नको उगाच बहाणे
धुंद प्रेमात होऊनी
गाऊ प्रीतीचे तराणे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




प्रज्ञा महिला मंच
आयोजित उपक्रम
विषय -प्रेम
मुक्तछंद
      *प्रेम भावना*
    
प्रेम  असे उत्कट भावना
कसे करु  तिचे गुणगान
होत नाही  कधी किंमत प्रेमाची
प्रेम देई मनाला समाधान
प्रेमात नसे कधी मी तू पण
अंतरी वाटे सदैव एकभाव
जणु  असूनी दोन जीव 
 आहोत  एकच आपण
आपुलकी भावना
येई  उचंबळून
स्वार्थी भावाचा असे अभाव.
सर्वस्व त्यजण्यात
अर्पण करण्यात
प्रेम दिसे सदैव तत्पर
करुणा, दयाचे झरे
वहाताती निरंतर
जशी नदी सहूनी
कडेकपारीतून येई धावत
जीवाला तिच्या नसे खंत
तिच भावना एकमेकासाठी
कष्ट करण्यात नसे उसंत
अशी ही प्रेम भावना
  वसे प्रेम  चराचरात
निसर्गात पण भरलेले प्रेम 
तोच देई आनंद भरभरूनी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद













प्रेमाची गाडी 


सर्वधर्मसमभाव साहित्य मंच
आयोजित उपक्रम क्84
31/1/23
विषय..प्रेमाची गाडी


 सहजीवनाच्या प्रवासास 
बसलो प्रेमाच्या गाडीत
मिळाली आश्वासक साथ
आनंद आहे, मनाच्या स्मृतीत

कधी झाला , प्रवास कष्टाचा
पण होती जाणिव मनाला
होणार आहे चीज श्रमाचे
सुखकर मिळणार पुढे जीवाला

उन पावसाळे  अनेक पाहिले 
पण नव्हती कधीही भ्रांत
प्रेमाच्या गाडीत होते खरतर
समाधानी मन सदा शांत

दृढ विश्वास  हा हवाच
 प्रेमाची गाडी धावे भरधाव
  सख्याहरी असता पाठीशी 
 दु:ख तर नसेची  ठाव.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

घे कबुतरा उंच भरारी

 माझी  लेखणी - 3

आयोजित 

उपक्रम 

विषय - घे कबुतरा उंच भरारी

       

       नभ ठेंगणे

जात्या स्वभावाने घाबरट

आहेस तू पक्ष्या कबुतरा

किती शांत प्रेमी तू स्वतः

 घे भरारी नभी क्षणभरा


खुणावते पहा गगन तुला

भर  बळ पंखात जोमाने

भरता उभारी मनातूनी

होशील मोठा  कर्तृत्वाने


तूच तर आहे संदेश वाहक

जातो मैलो मैल उडत

देता संदेश प्रिय जनांचे

कधीच नाही बिचकत


आहे तुझ्यात जे गुण

घेत रहा जीवनी भरारी

घेतील शिकवण तव कडूनी

हो तूची वृत्तीने  करारी


दाखव तुझे कर्तृत्व  जगा

 थांबव आता सदा कुढणे

घेता उंच भरारी नभात

भासेल तुज नभ ठेंगणे


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

दिलेल्या शब्दावरून काव्य. दिन सुखाचा

स्वप्न गंध साहित्य समूह आयोजित उपक्रम माझा शब्द आधारित

सर्व शब्द एका दृष्टिक्षेपात
 विरहिणी , विहंगम, ओमकार, सांजवेळ, अनामिका , अवचित, रातराणी, सहकार,अनुभूती, रंगमंच,वरदान ,संवादिनी , निशिगंध ,विरंगुळा, रानोमाळ, आशीर्वाद,सहजता ,मानवता, नभांगण ,वासुदेव ,रंगगंध , दरवळ, तरुतळी , अलवार, मृगजळ,सौदामिनी,  अनुराग, सहचर ,आठवण ,आईबाप, सहकारी, सुप्रभात ,कवडसे, अवखळ, करपाश,तरुणाई,अनाहुत=३७ शब्द


स्वप्न गंध साहित्य समूह आयोजित उपक्रम माझा शब्द आधारित
वरील शब्द घेऊन 

अष्टाक्षरी काव्य रचना

   *दिन गेला सुखात*

होता  झुंजुमंजु आज
 *वासुदेव* आला दारी 
गाता सुरेख भुपाळी 
*सुप्रभात* झाली भारी.    1 

पाहताची *सहचर*
भेट घडे *अवचित*
वाटे मोद क्षणभर
मनी आवडे खचित.     2

छान *विरंगुळा* मना
 भटकले *रानोमाळ*.  
मजा केली *तरुतळी*
मस्त रंगली सकाळ.    3


गोड मनी *आठवण* 
परतले मी सदनी. 
वाजविली *संवादिनी*. 
 दाटे मोद मनोमनी    4


*सांजवेळ* ती समीप.
  ओठी नाम *ओमकार*
लावूनिया देवा दीप.
मागितला *सहकार*.  5


सांजवात लावुनीया
उजळवू *सांजवेळ*  
दरवळे *रातराणी*  
जमलाची छान मेळ.  6


*आठवण* सदा ठेवू 
आईबाप  ते महान
 शिरी त्यांचा *आशीर्वाद*  
तेची मज *वरदान*          7

वैशाली वर्तक
अहमदाबाद 

शब्द 17

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...