सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम क्रमांक ३२३
विषय ..आयुष्याची जमापूंजी
शिकवण दिली बालपणी
करण्या जमा पूंजी विद्येची
भविष्य घडेल उद्याचे
जवळ असता पूंजी ज्ञानाची
थेंबे थेंबे पाणी साठे
जमा करा पूंजी धनाची
आई बाबा सदा वदती
काळजी त्यांना भविष्याची
सरकारच्या विविध योजना
करण्या सुखी निवृत्ती जीवन
पैसा जमवून निधी जमवा
मस्त राहिलं आनंदी मन
लक्ष्मी तर हवीच जीवनी
दिसतो तिचा तोरा वेळोवेळी
जीवनी सत्कर्माची पण पूंजी
कामी येते आयु सरते वेळी
मान सन्मान मिळावा जीवनी
उज्वल दावूनी कर्तृत्व
व्यक्तिमत्वाचा दाखवा ठसा
आयुष्याच्या पूंजीत त्यांचे महत्त्व
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा