अ भा म सा प ठाणे जिल्हा 2
उपक्रम काव्य रचना
14/5/22
विषय - मळभ
जागे झाले झोपेतून
स्वप्न पाहूनी भयंकर
मन धावे सैरावैरा
वाईट विचार क्षणभर
उगा का म्हणती जन
मन चिंती , न वैरी चिंती
तशी झाली माझी स्थीती
न उमजे करण्या कृती
मनाच्या आभाळी आले
अनेक शंकांचे मळभ
मनी दाटले काहूर
उमजे ना विचार सुलभ
हात जोडूनी देवाला
मन लावले नामस्मरणात
शांत चित्ते बसता देवा जवळी
विसर पडला विचारात
सरले शंकेचे मळभ
यावी सर पावसाची
निरभ्र मन आभाळ
विरली दाटी विचाराची
वैशाली वर्तक
अहमदाबादमळभ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा