मी कशाला आरशात पाहू*
सकाळी करिते देव दर्शन
त्यासाठी पहाते आरशात
निहाळते मी स्व मुख
कारण ,...म्हणे देव वसे अपुल्याच अंतरात
देव दर्शन घेण्यास
रुप पहाणे दर्पणात
हाची उद्देश असे माझा
मग आलेच ना पहाणे आरशात.
आरसा दाखवी गुण दोष
देतो सदा तयाचे मत प्रांजल
न वाढविता वा कमी करिता
आवडे पहाया मला रुप सोज्वल
टापटीप नेटके पणा हवाच
मग आरसाच येतो कामास
आरशात पहाणे आलेच ओघाने
दाखवितो रुप आपणास
दिले देवाने सुरेख सृदृढ तन
तया नीट नेटके राखण्या
जसे व्यायाम असे जरुरी
हवा दर्पण सौंदर्य तनाचे पाहण्या
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा