भाषा प्रेमाची 7/2/2019
भाषा नसते प्रेमाला
भावनांचा असे खेळ
सारे कळे न वदता
जमे जीवांचा जो मेळ
भावनांचा असे खेळ
सारे कळे न वदता
जमे जीवांचा जो मेळ
शब्दाविणा समजते
गुज मनीचे क्षणात
प्रेम म्हणती तयाला
भाव उमजे मनात
गुज मनीचे क्षणात
प्रेम म्हणती तयाला
भाव उमजे मनात
भाव असता उत्कट
नसे गरज बोलणे
माझे प्रेम तुझ्यावरी
शब्दा शिवाय कळणे
नसे गरज बोलणे
माझे प्रेम तुझ्यावरी
शब्दा शिवाय कळणे
आहे माध्यमे प्रेमाची
स्पर्श , संकेत , कटाक्ष
भाव दावी अंतरीचे
प्रेम भाषेत चाणाक्ष
स्पर्श , संकेत , कटाक्ष
भाव दावी अंतरीचे
प्रेम भाषेत चाणाक्ष
होता असाच प्रेमाचा
स्पर्श कधी ओझरता
क्षणभर नकळत
शब्द न, ते पाझरता
स्पर्श कधी ओझरता
क्षणभर नकळत
शब्द न, ते पाझरता
अशी भावना प्रेमाची
निसर्गात भरलेली
पाखरांना कुठे बोली
तरी प्रीत झरलेली. .
निसर्गात भरलेली
पाखरांना कुठे बोली
तरी प्रीत झरलेली. .
.....वैशाली वर्तक
*******************************
***प्रकार काव्यबत्तीशी**
*********-*******************
प्रणय 9/7/9/7
नसते भाषा प्रणयाला
भावनांचा तो खेळ
सारे कळे न वदताच
जमे जीवांचा मेळ
नसता शब्द समजते
गुज सारे क्षणात
प्रणय म्हणताती जन
भाव कळे मनात
भाव असताची उत्कट
नुरते ते बोलणे
माझे प्रणय तुजवरी
शब्दा विना कळणे
आहे माध्यमे प्रणयाची
स्पर्श खुणा कटाक्ष
भाव दावण्या अंतरीचे
प्रेमात ते चाणाक्ष
होता असाची प्रणयाचा
स्पर्श तो ओझरता
क्षणभर ही नकळत
शब्दही न बोलता
अशी प्रणयाची भावना
निसर्गी भरलेली
पाखरांना कुठली बोली
प्रीत ती झरलेली
वैशाली वर्तक
..............
अ भारतीय ठाणे जिल्हा समूह १
आयोजित उपक्रम क्रमांक ७१७
विषय ..संकेत मिलनाचा
संकेत असे महत्त्वाचा
सदा प्रेमाच्या जगात
निव्वळ खूणा खाणांनी
गुज कळे प्रणयात
उगा का लेखणी वदते
नको भडिमार शब्दांचा
तृषित आहे तुझ्या दर्शनाला
विसरु नको संकेत मिलनाचा
अशी भावना प्रेमाची
निसर्गात पण भरलेली
पाखरांना कुठे बोली
तरी प्रीत झरलेली. .
कटाक्षाने डोळे बोलतात
घायाळ करित क्षणाला
क्षणार्धात भावना उमजती
मिलन घडे वचनाला
वैशाली वर्तक
अहमदाबाद
गाली गुलाब फुलले
सिध्द साहित्यिका समुह
विषय -- गाली गुलाब फुलले
वाट तुझी पहाण्याची
वेड्या मनाची ही रीत
बघ सांजवेळ झाली
सख्या धुंद झाली प्रीत
होता नजरा नजर
गाली गुलाब फुलले
उगा पाहता दर्पणी
मन माझे आनंदले
येता समीप सखया
अनुराग भरे ऊरी
गाली गुलाब फुलले
प्रीत गंधित अंतरी
बघ झुकल्या पापण्या
मन तुझ्यात गुंतले
वेड लागले जीवास
गाली गुलाब फुलले
प्रीत अबोल जाहली
नको उगाच बहाणे
धुंद प्रेमात होऊनी
गाऊ प्रीतीचे तराणे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
प्रज्ञा महिला मंच
आयोजित उपक्रम
विषय -प्रेम
मुक्तछंद
*प्रेम भावना*
प्रेम असे उत्कट भावना
कसे करु तिचे गुणगान
होत नाही कधी किंमत प्रेमाची
प्रेम देई मनाला समाधान
प्रेमात नसे कधी मी तू पण
अंतरी वाटे सदैव एकभाव
जणु असूनी दोन जीव
आहोत एकच आपण
आपुलकी भावना
येई उचंबळून
स्वार्थी भावाचा असे अभाव.
सर्वस्व त्यजण्यात
अर्पण करण्यात
प्रेम दिसे सदैव तत्पर
करुणा, दयाचे झरे
वहाताती निरंतर
जशी नदी सहूनी
कडेकपारीतून येई धावत
जीवाला तिच्या नसे खंत
तिच भावना एकमेकासाठी
कष्ट करण्यात नसे उसंत
अशी ही प्रेम भावना
वसे प्रेम चराचरात
निसर्गात पण भरलेले प्रेम
तोच देई आनंद भरभरूनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा