शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

प्रणु शब्दावली.....4. .प्रवास \सावली कवित्व \लतादिदी/दादासाहेब फाळके.

स्वप्न गंध साहित्य समूह
आयोजित उपक्रम क्रमांक 165
प्रकार.. प्रणु शब्दावली 
 1 विषय...प्रवास 

  जीवनाचा प्रवास 
आनंदाचा हमखास 
असता समाधानाची आस
 विलसते हास्य मुखावर

प्रवास हिवाळ्यात
आतुरता मनात 
मजा येते करण्यात 
भटकंती आवडे  आयुष्यभर जगभर 

 येतात दूरवरून 
पक्षी परदेशातून
 थव्याने पक्षी निहाळून 
  आनंद  मावेना  क्षणभर

करावे देशाटन
 आनंदाचे क्षण
प्रफुल्लित रहाते मन
प्रवासी आनंदी जीवनभर

केल्याने अविरत
सांगते मनोगत          
ज्ञान वाढे हकीकत
प्रवास करा आयुष्यभर

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




स्वप्नगंध साहित्य समूह
प्रणू शब्दावली उपक्रम
2. विषय.. सावली 

राहते बरोबर 
साथ निरंतर 
न देता अंतर
आपली सावली छाया
           
छत्रछाया  मायबापाची
गोडी सहजीवनाची 
कृपादृष्टी होता देवाची
जीवन प्रेमळ माया


असे सदा संगती 
जीवनाची सोबती
सावलीत खेळ रंगती
सावली करी माया 
        
 वृक्षांची  सावली
  जनमने आनंदली 
  गाई गुरे विसावली 
 पथिकांना दिधली छाया


वैशाली वर्तक
अहमदाबाद


प्रकार ...प्रणु शब्दावली
   3 विषय. कवित्व

 करिता सराव 
 विचारांचा ठराव 
कल्पनांचा नसे अभाव 
साकारते रचना सहज

लेखणीचा संग
विचारात दंग
कवितेस चढे रंग
कवित्व जागणे गरज

कल्पना अवगत
विचार अविरत 
मनात वाहती खळाळत 
कवित्वाची दिसे उमज.


धार साहित्याला
  मनीच्छा कवित्वाला
स्वस्थ न बसण्याला 
लक्ष  जणु सावज

साकारण्या कविता
भावनांची सरिता
लेखणीची पहा अधीरता
नव काव्य प्रकारात सहज

वैशाली वर्तक
अहमदाबाद


स्वप्न गंध साहित्य समूह
जागतिक मराठी दिन विशेष उपक्रम
मराठी कलाकार वर्णन
गान कोकिळा लतादीदी 
******************************
4. शीर्षक...दुजी न होणे  लता    

 रहाणी सोज्वळ 
 जीवन निर्मळ
  यश प्राप्तीत प्रांजल
 लतादीदीचे ऐकू गायन       

  ऐकावी भुपाळी
  रोजच सकाळी 
  भावपूर्ण गाणी सदाकाळी
  आनंदमयी करी वातावरण   

  लतादीदी खरोखर 
  भासे क्षणभर
  साधना तितकीच बरोबर
  कर्तृत्वाला तियेच्या नमन

  गोडवा स्वरातला
  भाव  मनातला
 परिपूर्ण दिसे गीतातला
 होई भावनांचे दर्शन 

सुखाच्या स्वरांनी
तृप्त मनानी
ओंजळ नव रसांनी
भरूनी करूया सैवन 

ओठावरची  गाणी
अमृताची वाणी
ऐकता येई डोळापाणी
स्वरसम्राज्ञी वदती जन


वैशाली वर्तक 
अहमदाबाद







स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित जागतिक मराठी दिनानिमित्त विशेष उपक्रम
प्रणु शब्दावली काव्यलेखन
मराठी कलाकार वर्णन
5.  कलाकार.. दादासाहेब फाळके


चित्रपटाचे जनक
उत्तम दिग्दर्शक
तैलचित्र कलेचे उपासक
दादा साहेब होते खास 

कला अवगत
शिकण्याची शिकस्त
जेजे स्कूलचे पारंगत
चित्रपट व्यवसायाचा ध्यास 

नौकरी त्यजून
व्यवसाय धरून 
मुक चित्रपट बनवून
झाली पूर्ततेची  आस

वाढ रोपट्याची
पहिल्या लघुपटाची
राजा हरिश्चंद्र चलचित्राची
झाला शुभारंभ अभ्यास 


दाखविली जीवनाची 
 ओढ  अंतरीची
 चित्रपटात फॅक्टरी हरिश्चंद्राची 
सन्मानित कलावंत हमखास

वैशाली वर्तक
अहमदाबाद..











गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

लेख...ध्यास नवा आस नवी


सिद्ध साहित्यिक समूह
विषय .. ध्यास नवा आस नवी

सूर नवा ध्यास नवा कार्यक्रम ऐकत होते. सारे गायक नव्या नव्या( त्यांच्यासाठी )नव्या नव्या सूरांचा अभ्यास करुन संगीत  कला आत्मसात  करण्याचा व कला प्रदर्शित  करण्याचा जीवापाड प्रयत्न करत  होते. व जीवनात पुढे पुढे जाण्याचा... प्रगतीचा ध्यास मनी धरून पावले टाकीत होते.
   सहज मला विचार आला खरच जीवन पण गाणे आहे. त्यात सप्त सूर..इंद्रधनुचे सप्त रंग भरण्याचा ध्यास  मनी पाहिजे तर  जीवन सुखमय, तालमय, आनंदी ,सुखी , प्रगतीशील होईल.
       प्रत्येकाला जीवनी काही ना काही   विशेष करुन दाखवू. .. चार लोकांत उठून कसे दिसू याचा ध्यास असतोच.आणि असावाच. जो जरुरीच आहे.
         आता सरत्या वर्षाला   या वर्षात काय कमविले.. काय गमविले  यांचा आढावा घेत.नव्या वर्षात जुन्या चुका वा गडबडीने झाले ला गोंधळ होणार नाही याची दक्षता बाळगत नव्या वर्षाच्या स्वागताला सारे तयार होतील. गेल्या वर्षा पेक्षा काही नाविन्य घडवू अशा विचारात मनी बरेच संकल्प करत असतील.
तर देश धर्म  संस्कृती ह्याचा विचार माझ्या मनी सहज आला. आपल्याला देश आपला देव मानला पाहिजे.   आपण  सा-या नागरिकांनी आपला धर्म , संस्कृती ,कशी टिकेल.  त्यासाठी आपल्या येण्या-या पिढीला उत्तम संस्कार देत देशभक्ती ची भावना जागृत करूया.   परदेशाकडील हिरवळ सर्व
जनांना फार आकर्षक भासत असते.. तेथील भौतिक सुख मनाला भुरळ पाडते . खरं आहे ,परदेशातील 
 आधुनिक तंत्रज्ञानाने जीवन सुखकर होते.कमी महेनतीत कामे होतात. त्यामुळे परदेशात जाण्याचा ओध
वाढत आहे ,पण  आता आपला देश पण प्रगती पथावर आहे. सर्व भौतिक सुख येथे पण उपलब्ध होत आहेत. तिथल्या सुखसोयी आपल्या देशात सहज मिळत आहे. देशातील सर्व सामान्य माणसाचे रहाणीमान पण सुधारत आहे. वैज्ञानिक पण मेहनत करून देशाला उच्च स्थान देण्यात झटत आहेत.
तर आपण पण सर्व नागरिकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यात एकजूटीने कार्यरत होऊया. आपला देश प्रगतीपथावर वर आहेच... तो असाच प्रगती पथावर चालत राहिल व विश्वात कसा शोभेल याचा ध्यास  मनी बाळगून....तीच आस पूर्णत्वास नेण्याची मनोकामना धरु. 
      पर्यावरण जतन करणे.... मुलगी वाचवा मुलगी शिकवा .या सर्व मोहिमीना जोमाने उत्साहाने उचलून त्या बाबतीत प्रत्येक नागरिकात जागृती निर्माण करू. पुन्हा नव्याने देश स्वावलंबी बनविण्याचा ध्यास असावा.
स्वदेशीचा लावुया नारा, देश होण्या आत्म निर्भर
 पुन्हा  नव्याने वाहुद्या झरे, स्वावलंबनाचे देशभर.

          तसेच दिपक अंधार दूर सारतो नवी आशा दाखवतो .तसे शिक्षणाच्या दिव्याची ज्योत लावून
मुलींना शिक्षित केल्याने .आज आपण पहात आहोत की सर्व क्षेत्रांत नारी आघाडीवर आहेत.तर
शिक्षणावर भर देऊन ज्ञानाची गंगा वाहती ठेवू. अंधश्रद्धेचे निर्मूलन करू.महत़्वाचे सकारात्मक भावना
अंगिकारू.

  दिवा  दूर करीतो तिमीर  ,दावितो नवी आशा  जीवाला 
 प्रतिक असे  सकारात्मकतेचा , सदैव तेजाळू दिपकाला.          

 अशा भावना मनी बाळगून सकारात्मक  विचार  ठेवू. भारत देशाला महान करण्याची आस धरू
तसेच
       विश्व शांतीची  मशाल, तेजाळू  द्या संस्कृती ची
      नांदावी सुखशांती  जगात, अशाच  उदात्त  भावनेची
 अशी उदात्त भावना मनी रहावी . त्यासाठी संतांची शिकवण आठवणी त घेऊ. जाती भेद दूर सारून
विश्व बंधुत्वाची.. हे विश्व माझे कुटुंब भावना मनी आणू.

दिवा लावू विश्व शांतीचा 
तेजाळूया समई संस्कृतीची
नांदेल सुखशांती  जगात
विशाल उदात्त  भावनेची.   

 विसरूनी  जाता जातीभेद ,
समजून घेऊ नव्याने समतेला,
ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा, 
दिलेला मंत्र  देऊ  जगताला.      
        असे काही विचार मनात आले . व त्या विचारात   नवा ध्यास नवी आस मनी दृढ झाली.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

भारतीय संस्कृती ... परंपरा



विषय - भारतीय संस्कृती

     *संस्कृती महान*

 भारतीय संस्कृती  आपुली
आहे   अति पुरातन
रुढी अन्  परंपरेची सदैव
  करतोय  आपण जतन

सारे मानव आहेत बांधव
माणुसकीची देत शिकवण
मानवता हाची  धर्म हीच
  उदात्त भावना करते साठवण 

 साजरे करिते सणवार उत्सव 
 दाविते तयातून रूढी परंपरा
उत्सवातून दिसे समाजप्रेम
 समतेची ध्वजा हाती धरा

 
 किती वर्णावी संस्कृती ची गाथा
येथेच जन्मले  संत, वीर महान
अन् अंतराळात जाणारे शास्त्रज्ञ 
काय सांगावी संस्कृतीची शान

अशी महान संस्कृती  भारतीय
असावा मनी सदा अभिमान
साहित्य , कला, क्रिडा ,संगीतात
एक एक चमकते तारे महान






आभा म सा प समूह2 
आयोजित 
विषय - परंपरा


  जुनी संस्कृती भारतीय
  चालवित आली परंपरा
पिढ्यान् पिढ्यांनी  घेत
पुढे चालतोय वारसा

जुने रिती रिवाजात
सामाजिक   करुन बदल
नव्या रितींचे अनुसरण
केले हे घडले नवल

सण वार पारंपारिक 
होतात देशभर साजरे
संस्कार  संस्कृती  चे जतन
दिसते सर्वत्र  हासरे

लाभलाय आपल्याला
भक्ती रस साहित्याचा 
 संत वाणीचा वारसा
तोची आमुल्य ठेवा परंपरेचा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

मी अजून हरलो नाही

स्वराज्य लेखणी मंच
आयोजित स्पर्धा
स्पर्धेसाठी
विषय.  मी अजून  हरलो नाही 


जीवन तरआहेच
तीन अंकांचा खेळ .
कसे जगावे त्यात आनंदाने
 जमवावा लागे मेळ

 संघर्षा शिवाय नसे जीवन
अन् तेव्हाच होते प्रगती 
महेनत करण्याची जिद्द मनी
जाणतो साधनेची महती

घेतो शिकवण निसर्गाची
कसा हसतोय तोही संघर्ष
करीतो सदैव यत्न
साधण्या जीवनी उत्कर्ष

मिळो यश अपयश
हार कधी नाही मानत
अपयश पायरी यशाची
हेच विचार मनी ठसवत

शिकवण साध्या कोळ्याची
कितीदा पडुन न हरतो
तसा मीही न करीता कसूर
आत्मविश्वासाने यत्न करतो

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

शाळेतील फळा

कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित उपक्रम
विषय... शाळेतील फळा


अक्षरे तयावर उमटतातच
कोरा काळा कुट्ट फळा
बोलतो कसा  धडाधडा
दावी आगळीच कळा

असो विषय कुठलाही
ज्ञान देतो मनोभावे
पहिले लिहिलेलं पुसता
मागचे न तया  ठावे

कधी विज्ञान तर गणित
 घडे तासा तासात बदल
 फिरता  हात गुरुंचा
 




वैशाली वर्तक
अहमदाबाद

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३

कुणी सांगाल का

 

कुणी सांगाल का?


विज्ञानाच्या प्रगतीने

 प्रश्न उकेल होतात सहज

गुगल महाराज असता हजर

कुणी सांगाल का ? ची नुरे गरज


प्रश्न असो  कुठल्याही विषयाचा

मिळते क्षणात उत्तर खचित

ज्ञान भरलेय जगभराचे

बटण दाबताच प्रश्नोत्तरे मिळे सदोदित


जरी होऊनी सारे ज्ञानी  , तज्ञ

काही प्रश्न मनाला पडे

जयांची उत्तरं न सापडे

जैसे, ऋतू चक्र कसे न सांगता घडे?


साधा प्रश्न पक्ष्याजवळी, कुठले घड्याळ

पण उठणे नित्याने सदा काळ

तयांच्या किलबिलाटाने

होते , आपली सुखद सकाळ.


नवजात  शिशुला पहा

कोण शिकवे स्तनपान

कसे न सांगता तेही 

सुरू करी छान दुग्धपान


असे काही नैसर्गिक प्रश्न

 मोराचे नाचणे, कोकिळ कुजन

कुणी सांगाल का उत्तर?

 जी देई  मानवास सहज शिकवण.




वैशाली वर्तक

अहमदाबाद ३०\९\२३


मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

उत्सव नवरात्रीचा आणि जागर स्त्री शक्तीचा \ देवी शारदा

नमस्कार
स्वप्नगंध समूह आणि प्रणू चाराक्षरी समूह विद्यमाने आयोजित "उत्सव नवरात्रीचा आवणि जागर स्त्री शक्तीचा" या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात मी - सौ वैशाली अविनाश वर्तक -आपले सहर्ष स्वागत करत आहे. नवरात्रीच्या या विशेष कार्यक्रमात मला आमंत्रित केल्याबद्दल समूह प्रशासिका सौ.प्रणाली म्हात्रे आणि समूह संचालिका सौ.अनिता गुजर यांचे मी मनःपूर्वक आभार मानते.

आज घटस्थापनेचा आठवा दिवस आज देवीच्या  महागौरी या रूपाचे  पूजन .  आजचा रंग मोरपिशी . देवीच्या ह्या रूपाच्या पूजनाबरोबर मी आपल्या घराघरातील स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आजची आठवी  स्त्री शक्ती म्हणजेच  ... *आजी* हिला माझी आठवी माळ अर्पण करून माझी रचना सादर करते
अर्थात माझी कविता माझ्या  आजीवर

कविता

स्त्री असे   दैवी शक्ती
पहा तिला विविध रुपात
जसे ममतेने भरले रुप आईचे
मिळे प्रेम  आजीच्या सहवासात

अशीच होती आजी माझी
जरी नव्हती ती साक्षर
केले तिने मला  या जगी व्यवहारी
देऊन उत्तम  संस्कार  मजवर

घेतली रोज म्हणूनी शुभंकरोति
रामरक्षा मनाच्या श्लोकांचे पठण
केले तिने जगी मजला सजाण
करुन घेतले नित्य  नाम स्मरण

दिली शिकवण उत्तम  गुणांची
नको राहू मोह मायात पळभर
सांगून रामायणाच्या गोष्टी 
घडविले जगण्यास आत्म निर्भर

ख-या अर्थाचे  अनुभवी बोल
नसता घड्याळ सांगे ,थांबवा खेळ
नसुनी शिकलेली सावरलेली
उन्हे पाहून सांगेअचूक शाळेचीवेळ

 आजी म्हणजे  असते जणू
दुधावराची मऊ मऊ साय
तिच्या स्पर्शात  भरली माया
तिच्या बद्दल कितीही बोलता उणेच हाय

बोला .... अंबे मातकी जय




काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित 
साहित्यिक नवरात्री उत्सव 
काव्य प्रकार नवाक्षरी
विषय. देवी सरस्वती 

 स्तवन शारदेचे

माते देवी श्री सरस्वती
तुजला करिते नमन
तूची विद्येची ती दायिनी
तुला आलेची मी शरण

शुभ्र कुंद शोभती माळा
श्वेत वस्त्रात परिधान
शांत सोज्वळची ते रुप
देई मनास समाधान

श्वेत कमळाचे आसन
हातात वीणा झंकारते
वसो चित्तात रुप तुझे
सदैव मनास लोभते

ब्रह्मा विष्णू व महेश ही
तुज करिताती नमन
मंद मतीला हरण्यास
करुया तुझेच पूजन

ज्योतिर्मय तुझीच मूर्ती
किती गाऊया गुण गाथा
 ठेवीतसे  आम्ही विनयाने
तव चरणी  सदा माथा

तव मूर्ती सदैव साजरी
पाहूनिया प्रसन्न  मन
शांत भाव ते मूखावरी
 पावती आनंद दर्शने

तुची असे ज्ञान दायिनी
वदती तुज भगवती
दूर करण्या जड मती
दे सदा जीवनी सुमती

तव गुण गाथा वदती
नित्य नेमे ज्ञान मंदीरी
मिळवती तव आशीष 
असती तत्पर अंतरी

तव कृपेचा हातशिरी
राहो  आम्हावर सर्वदा
नच भासे मग उणीव 
जीवनात कदापि कदा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...