शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३

कुणी सांगाल का

 

कुणी सांगाल का?


विज्ञानाच्या प्रगतीने

 प्रश्न उकेल होतात सहज

गुगल महाराज असता हजर

कुणी सांगाल का ? ची नुरे गरज


प्रश्न असो  कुठल्याही विषयाचा

मिळते क्षणात उत्तर खचित

ज्ञान भरलेय जगभराचे

बटण दाबताच प्रश्नोत्तरे मिळे सदोदित


जरी होऊनी सारे ज्ञानी  , तज्ञ

काही प्रश्न मनाला पडे

जयांची उत्तरं न सापडे

जैसे, ऋतू चक्र कसे न सांगता घडे?


साधा प्रश्न पक्ष्याजवळी, कुठले घड्याळ

पण उठणे नित्याने सदा काळ

तयांच्या किलबिलाटाने

होते , आपली सुखद सकाळ.


नवजात  शिशुला पहा

कोण शिकवे स्तनपान

कसे न सांगता तेही 

सुरू करी छान दुग्धपान


असे काही नैसर्गिक प्रश्न

 मोराचे नाचणे, कोकिळ कुजन

कुणी सांगाल का उत्तर?

 जी देई  मानवास सहज शिकवण.




वैशाली वर्तक

अहमदाबाद ३०\९\२३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...