सिद्ध साहित्यिक समूह
विषय .. ध्यास नवा आस नवी
सूर नवा ध्यास नवा कार्यक्रम ऐकत होते. सारे गायक नव्या नव्या( त्यांच्यासाठी )नव्या नव्या सूरांचा अभ्यास करुन संगीत कला आत्मसात करण्याचा व कला प्रदर्शित करण्याचा जीवापाड प्रयत्न करत होते. व जीवनात पुढे पुढे जाण्याचा... प्रगतीचा ध्यास मनी धरून पावले टाकीत होते.
सहज मला विचार आला खरच जीवन पण गाणे आहे. त्यात सप्त सूर..इंद्रधनुचे सप्त रंग भरण्याचा ध्यास मनी पाहिजे तर जीवन सुखमय, तालमय, आनंदी ,सुखी , प्रगतीशील होईल.
प्रत्येकाला जीवनी काही ना काही विशेष करुन दाखवू. .. चार लोकांत उठून कसे दिसू याचा ध्यास असतोच.आणि असावाच. जो जरुरीच आहे.
आता सरत्या वर्षाला या वर्षात काय कमविले.. काय गमविले यांचा आढावा घेत.नव्या वर्षात जुन्या चुका वा गडबडीने झाले ला गोंधळ होणार नाही याची दक्षता बाळगत नव्या वर्षाच्या स्वागताला सारे तयार होतील. गेल्या वर्षा पेक्षा काही नाविन्य घडवू अशा विचारात मनी बरेच संकल्प करत असतील.
तर देश धर्म संस्कृती ह्याचा विचार माझ्या मनी सहज आला. आपल्याला देश आपला देव मानला पाहिजे. आपण सा-या नागरिकांनी आपला धर्म , संस्कृती ,कशी टिकेल. त्यासाठी आपल्या येण्या-या पिढीला उत्तम संस्कार देत देशभक्ती ची भावना जागृत करूया. परदेशाकडील हिरवळ सर्व
जनांना फार आकर्षक भासत असते.. तेथील भौतिक सुख मनाला भुरळ पाडते . खरं आहे ,परदेशातील
आधुनिक तंत्रज्ञानाने जीवन सुखकर होते.कमी महेनतीत कामे होतात. त्यामुळे परदेशात जाण्याचा ओध
वाढत आहे ,पण आता आपला देश पण प्रगती पथावर आहे. सर्व भौतिक सुख येथे पण उपलब्ध होत आहेत. तिथल्या सुखसोयी आपल्या देशात सहज मिळत आहे. देशातील सर्व सामान्य माणसाचे रहाणीमान पण सुधारत आहे. वैज्ञानिक पण महेनत करून देशाला उच्च स्थान देण्यात झटत आहेत.
तर आपण पण सर्व नागरिकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यात एकजूटीने कार्यरत होऊया. आपला देश प्रगतीपथावर वर आहेच... तो असाच प्रगती पथावर चालत राहिल व विश्वात कसा शोभेल याचा ध्यास मनी बाळगून....तीच आस पूर्णत्वास नेण्याची मनोकामना धरु.
पर्यावरण जतन करणे.... मुलगी वाचवा मुलगी शिकवा .या सर्व मोहिमीना जोमाने उत्साहाने उचलून त्या बाबतीत प्रत्येक नागरिकात जागृती निर्माण करू. पुन्हा नव्याने देश स्वावलंबी बनविण्याचा ध्यास असावा.
स्वदेशीचा लावुया नारा, देश होण्या आत्म निर्भर
पुन्हा नव्याने वाहुद्या झरे, स्वावलंबनाचे देशभर.
तसेच दिपक अंधार दूर सारतो नवी आशा दाखवतो .तसे शिक्षणाच्या दिव्याची ज्योत लावून
मुलींना शिक्षित केल्याने .आज आपण पहात आहोत की सर्व क्षेत्रांत नारी आघाडीवर आहेत.तर
शिक्षणावर भर देऊन ज्ञानाची गंगा वाहती ठेवू. अंधश्रद्धेचे निर्मूलन करू.महत़्वाचे सकारात्मक भावना
अंगिकारू.
दिवा दूर करीतो तिमीर ,दावितो नवी आशा जीवाला
प्रतिक असे सकारात्मकतेचा , सदैव तेजाळू दिपकाला.
अशा भावना मनी बाळगून सकारात्मक विचार ठेवू. भारत देशाला महान करण्याची आस धरू
तसेच
विश्व शांतीची मशाल, तेजाळू द्या संस्कृती ची
नांदावी सुखशांती जगात, अशाच उदात्त भावनेची
अशी उदात्त भावना मनी रहावी . त्यासाठी संतांची शिकवण आठवणी त घेऊ. जाती भेद दूर सारून
विश्व बंधुत्वाची.. हे विश्व माझे कुटुंब भावना मनी आणू.
दिवा लावू विश्व शांतीचा
तेजाळूया समई संस्कृतीची
नांदेल सुखशांती जगात
विशाल उदात्त भावनेची.
विसरूनी जाता जातीभेद ,
समजून घेऊ नव्याने समतेला,
ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा,
दिलेला मंत्र देऊ जगताला.
असे काही विचार मनात आले . व त्या विचारात नवा ध्यास नवी आस मनी दृढ झाली.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा