मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

उत्सव नवरात्रीचा आणि जागर स्त्री शक्तीचा

नमस्कार
स्वप्नगंध समूह आणि प्रणू चाराक्षरी समूह विद्यमाने आयोजित "उत्सव नवरात्रीचा आवणि जागर स्त्री शक्तीचा" या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात मी - सौ वैशाली अविनाश वर्तक -आपले सहर्ष स्वागत करत आहे. नवरात्रीच्या या विशेष कार्यक्रमात मला आमंत्रित केल्याबद्दल समूह प्रशासिका सौ.प्रणाली म्हात्रे आणि समूह संचालिका सौ.अनिता गुजर यांचे मी मनःपूर्वक आभार मानते.

आज घटस्थापनेचा आठवा दिवस आज देवीच्या  महागौरी या रूपाचे  पूजन .  आजचा रंग मोरपिशी . देवीच्या ह्या रूपाच्या पूजनाबरोबर मी आपल्या घराघरातील स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आजची आठवी  स्त्री शक्ती म्हणजेच  ... *आजी* हिला माझी आठवी माळ अर्पण करून माझी रचना सादर करते
अर्थात माझी कविता माझ्या  आजीवर

कविता

स्त्री असे   दैवी शक्ती
पहा तिला विविध रुपात
जसे ममतेने भरले रुप आईचे
मिळे प्रेम  आजीच्या सहवासात

अशीच होती आजी माझी
जरी नव्हती ती साक्षर
केले तिने मला  या जगी व्यवहारी
देऊन उत्तम  संस्कार  मजवर

घेतली रोज म्हणूनी शुभंकरोति
रामरक्षा मनाच्या श्लोकांचे पठण
केले तिने जगी मजला सजाण
करुन घेतले नित्य  नाम स्मरण

दिली शिकवण उत्तम  गुणांची
नको राहू मोह मायात पळभर
सांगून रामायणाच्या गोष्टी 
घडविले जगण्यास आत्म निर्भर

ख-या अर्थाचे  अनुभवी बोल
नसता घड्याळ सांगे ,थांबवा खेळ
नसुनी शिकलेली सावरलेली
उन्हे पाहून सांगेअचूक शाळेचीवेळ

 आजी म्हणजे  असते जणू
दुधावराची मऊ मऊ साय
तिच्या स्पर्शात  भरली माया
तिच्या बद्दल कितीही बोलता उणेच हाय

बोला .... अंबे मातकी जय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...