बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

विधीलिखीत


विषय - विधिलिखित           13/7/2020


सामान्यतः असे  वदती जन
जे होते ते असते विधी लिखीत
मग कशाला करायचे प्रयत्न 
व्हायचे ते होणार हे...  खचित

कधी कोणास मिळते चिमूटभर 
तर कोणास मिळते ओंजळभर
ते तर असते विधीलिखीत फळ
तयासाठी लागते सत्कर्माचे बळ

म्हणती वृषभ रास असे भाग्यवान
चुकले का तयांना दुःखाचे पहाड
देवत्व पावूनी पण, कृष्ण अन् रामाला
सुटली नाही  दुःखाच्या नशिबाची पाठ

नैसर्गिक  आपत्तीत दगावतात माणसे
देवाच्या कृपेने तरली जाती लहान अर्भके
तिथे म्हणावे खेळ  विधी लिखीताचा
न करिता सायास जीव वाचविण्याचा

घडायचे ते घडणार ते नाही चुकणार
विश्वास हवा बाहुवर नको हस्त रेखांवर
अन् ठेवावी सदा दृढ श्रध्दा देवावर
मग विधी लिखीताची होते कृपा दृष्टी  आपणावर



वैशाली वर्तक
नोंदणी क्रमांक 189
अहमदाबाद 
गुजरात  स्टेट
8141427330

संयम. गुण स्वभावाचा

कमलविश्व राज्यस्तरिय स्पर्धा साहित्य समूह
आयोजित
मासिक भव्य राज्यस्तरिय काव्य स्पर्धा
विषय     
         संयम
   *गुण स्वभावाचा*

  संयम  हवा जीवनी
वागण्यात बोलण्यात
आणावा तो अंमलात
सुखी होतो जीवनात

रोजच्या जीवनाला
लावा वळण संयमाचे
म्हणजे जगण होते 
सदोदित नियोजनाचे 


नदीला असतो काठ
सागरास  असे किनारा
त्यामुळे वसतात नगर
 अन  मानवास निवारा

मर्यादा दिसे निसर्गात 
म्हणूनच चाले ऋतुचक्र
जरा होता असमतोल
होते निसर्गाची  दृष्टी वक्र


 ताबा हवा मनावर
 त्यालाच  संयम म्हणती
असे  तोची महत्वाचा 
सुखी होण्या जगती
  

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

असाच यावा पहाट वारा \उनाड वारा शब्दचित्र लेखन\! गार वारा कविता पिसाट वारा

कल्पतरू जागतिक साहित्य मंच
आयोजित
दशपदी काव्य
विषय - असाच यावा पहाट वारा

सोनसळी किरणांची उषा
देते मनास नवीन आशा

थंड वा-याची मंद झुळुक.                            
करी सदैव मना उत्सुक



पक्षी करीती किलबिलाट
करी प्रसन्नतेची पहाट

मंद स्वरात ऐकू भुपाळी
मंगलमय मन सकाळी

असाच यावा पहाट वारा
मरगळीस नसेची थारा

अनुभवावी अशी पहाट
पहावा तिचा अनोखा थाट


वैशाली वर्तक

शेतकरी साहित्य मंच
आयोजित उपक्रम क्रमांक ६८
४\१\२३.                                             वर्ल्ड व्हिजन टाईम्स मधे



                                                 

विषय ..उनाड वारा
  
फिरत होते रानमाळी
करी उल्हासित थंड वारा
देई स्फुर्ती तना मनाला
आनंददायी  निसर्ग सारा 

डुलत होती रोपे ,तरु
वा-याच्या लयीत तालात
भासे पर्णे वाजवी टाळ्या
मन गुंतले  रम्य निसर्गात

क्षणात आला *उनाड वारा* 
पहाता पहाता सुसाट झाला
खट्याळ दावी खट्याळपणा
कशी सावरू मी पदराला

मन पडले विचारात
थंड मंद झुळूक कशी
वाटे सदा हवी हवीशी
कानी कुजबुजते जशी

फिरत राहिले रानमाळ
रान फुले फुललेली मोहक
हसून जणु खुणावी डोलत
  रंगी विविध चित्त वेधक


 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

####################################################
विश्व लेखकांचे 
शब्द चित्र लेखन 
विषय ... खिडकीतून येणारा वारा

    श्रावण महिन्याचे दिवस होते. रजेचा दिवस त्यामुळे सारे कसं निवांत चाललं होते.
सकाळ चा चहाचा कप घेऊन बसले.  अलवार रेशीम पावसाच्या सरी पडत होत्या.
मी समोरच्या खिडकीतून येणारी थंड झुळूक अनुभवत व चहाचा मधे घोट घेत होते.
वा-याची थंड मंद झुळूक मनाला प्रसन्नता देत होती. 
     थंड वा-या सोबत खिडकीतून हळुच डोकावणारी जुईची फांदी जणू वा-यास आत ये  असे खुणेने सांगत होती. व  नाजूक पांढऱ्या फूलांचा सुगंध दरवळत होता. किती सुरेख. निसर्ग रम्य वातावरण चा अनुभव येत होता. 
    खिडकीतून पहाता छोटी रोपे वा-याच्या तालावर डुलत होती. जणु काही घरात लावलेल्या गाण्याचा  संगीताचा ताल साधत होती. रोपांची पाने आनंदाने टाळ्या वाजवित होती. 
  खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे निसर्ग निर्मित वातावरण झाले होते. मी पण या वा-यावर जाम खुश झाले. पण मधूनच वारा त्याचा खट्याळ पणा दाखवित होता.  खोडकर वारा पुन्हा पुन्हा माझा पदर सावरण्यात त्रस्त करत होता. आणि भाळीच्या लाडिक बटांना पुन्हा पुन्हा सावरण्यात माझा चहा थंड होत होता.
     तेवढ्यात जोराची पावसाची सर आली . व मला खिडकी बंद करावी लागली . वारा खिडकीवर थाप देत राहिला.
     

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

[20/12/2021, 8:16 pm] Vaishali Vartak: कल्याण डोंबिवली महानगर समूह2
आयोजित 
उपक्रम
काव्य लेखन 
विषय - गार वारा


 तप्त ग्रीष्मात हवासा वाटे
 थंड   गार गार वारा
स्पर्शता सुख अनुभवे
झुळुक रूपात न्यारा

  गार वारा  सोसायट्याचा
वाहे येता वर्षाधारा
मुजोर वारा छळे ललनास
पदर सावरता उठे शहारा

थंड गार वारा शरदातला
झोंबता अंगास भासे थंडी
सहज करी आठवण 
घाला गरम कपडे बंडी

   समुद्र किनारी  गार वारा
वहात येई लाटांवरी
 करीता गुजगोष्टी लाटांशी
  प्रसन्नता देई किना-यावरी


ऊन्हाच्या झळा साहूनी
 शीत वा-याचा घेण्या सहारा
सुसह्य करण्या   भासे गरज
वातानुकुलचा थंड वारा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित 
उपक्रम अष्टाक्षरी काव्य लेखन 
विषय ..आला अवखळ वारा 
 शीर्षक   *पिसाट वारा*


 होते बसले अंगणी
आली झुळूक वा-याची
किती पहा अलवार 
भासे मना उल्हासाची

मन पहा हर्षे  कैसे 
संतोषिले क्षणभर
तप्त जीवाला भासले
दिला मोद खरोखर .

क्षणी  बदलले रूप
वारा जाहला पिसाट
तरू  भासती  हासरी
 हास्य  ते खळखळाट 

खाली पडलेली पाने
फेर धरूनी नाचती
वाहे अवखळ वारा 
लोट धुळीचे उडती

त्रस्त करीता जिवाला
जीव नकोसा जाहला
वाटे कसे मी सावरू
माझ्या साडी पदराला.

वैशाली वर्तक 




गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

आशा

सर्व धर्म  समभाव साहित्य  मंच
आयोजित  उपक्रम क्र ५
विषय - आशा


आशा शब्दच देतो बळ
त्याची शब्दावर चाले जग
होता न कधी निराश मानव
प्रयत्न करत  जगतो मग

आशा असावी मनी सदा
जसे निशे नंतर ऊषा
करा मेहनत मिळवा यश
पहा यशाची मिळेल दिशा

होती मनी तेनसिंगला
एवरेस्ट वर  ठेवण्याचे पाऊल
त्या आशेच्या बळावर
त्याला लागली यशाची चाहुल

स्वातंत्र्य  प्राप्तीची आशा
होती स्वातंत्र्य  वीरांची
अतोनात करिता प्रयत्न 
आशा फळली स्वातंत्र्याची 

उगा का म्हणती जन
आशा असे  सदैव अमर
मोठ मोठे मिळवा यश 
प्रयत्न  करा तया बरोबर


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

तुळस. ...




भारतीय कोल्हापूर मंच
आयोजित
विषय तुळस माझ्या अंगणी
अष्टाक्षरी. प्रकार

      तुळस

शोभा वाढवी घराची
जेथे तुळस अंगणी
सदा राखते आरोग्य
जपा तिला मनोमनी

सांजवेळी लावताच
दिवा ज्योत वृंदावनी
घरातून प्रसन्नता
राहे सदा मनातूनी

नाव घेता प्रसादाचे
तुळशीचे हवे पान
होत नाही पूर्ण तोची
असा तिचा असे मान

जपताना पवित्रता
आरोग्यास गुणकारी
सर्दी खोकला पळवी
देई स्वास्थ्य घरी -दारी

विठ्ठलाच्या शोभे गळा
सदा तुळशीच्या माळा
आवडीने अर्पिलेल्या
दिसे सुंदर सावळा

अशी बहुगुणी वृंदा
हवी सदैव अंगणी
पवित्र्यात सदा उभी
मोद प्रसन्नता मनी


वैशाली वर्तक
अहमदाबाद








सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्रमांक 520
चित्र काव्य

     *संस्कृती जतन**

करी संस्कृती जतन
घेत मुलीला सोबत
घाली तुळशीला पाणी
हात जोडून हसत

देत माहिती रोपाची
आई देई शिकवण
किती वृंदा गुणकारी
होते जतन पर्यावरण

शोभा वाढवी घराची
जेथे तुळस अंगणी
सदा राखते आरोग्य
जपा तिला मनोमनी

आहे बहुगुणी वृंदा
हवी सदैव अंगणी
पवित्र्यात सदा उभी
मोद प्रसन्नता मनी


सांजवेळी लावताच
दीप ज्योत वृंदावनी
घरातून प्रसन्नता
राहे सदा मनातूनी.

वैशाली वर्तक
अहमदाबाद






राजा राणी

अ भाम प सा ठाणे जिल्हा २
आयोजित 
उपक्रम नं २६७
विषय - राजा राणी

खेळत होते पत्ते नातवाशी
पहिले राजाचे रूप रुबाबदार 
 आले पान हाती राणीचे
होती  नाजूक पण शानदार

रमले विचारात राजा राणीच्या 
मनी उठले विचार  तरंग
ठेवले तेथे निज  रुपाला
वाढला की मम मनी उमंग

आले हाती पान राजाचे
खुश झाले  मी मनात 
घेते बघा मुठीत आता
विसर पाडीन क्षणात

पत्त्यातील राजा राणी
भेटता माझ्या  हातात
रमले दोघे पहात एकमेका
जणु राजाराणी प्रत्यक्षात

असा झाला वैचारिक
मना मनातील खेळ
घटका भराची गंमत
मस्त मजेत गेलाना वेळ

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

लेख. चांदण्यात भटकंती व्दिपदी काव्य नको चंद्र तारे

वर्ल्ड व्हिजन टाईम्स मधे19/8/25

कल्पतरू जागतिक साहित्य मंच

चांदण्या रात्रीत भटकंती

    अहाहा काय  सुंदर टिपूर चांदणे .  काळ्याभोर आकाशी अनेक  लुकलुकणा-या चांदण्या  थंड मंद शीतल वा-याची झुळूक. नभी शशी तारिकांचा विलोभनीय खेळ.
जोडीला साथीदाराची सोबत.  मग काय विचारता ? सोने पे सुहागा सारिखे .
   दोघे हातात हात घेउन मस्त चांदण्यात फिरताना आगळीच मजा अनुभवली.
एक एक करत चांदणी शशी भोवती फेर धरून नाचत ... जणू काही रास करत होत्या.
मधेच शशी ढगा आड जाऊन तारिकाशी जणू लपंडाव खेळत होता.
सहज ओळी ओठी आल्या.

एक आगळा आनंद
चालतांना चांदण्यात
चमकती अगणिक 
तारे नभीच्या अंगणात

चंद्र चांदण्यांचा चाले
खेळ नभी लोभनीय
रुप खुले चंद्रासवे
चांदणीचे रमणीय

   अशा वातावरणात मन प्रसन्न आनंदित होते. प्रेमी युगुल  त्यांच्यात   खूश  होते.
जलाशयात शशीचे प्रतिबिंब  फारच मोहक दिसत होते.
 काळ्या  नभांगणी लुकलुक करणा-या तारिका मोहक हसत मुरडत फिरत आहे असे
लोभनीय दृश्य वाटत होते.
    कोजागिरीची  रात्र तर फारच सुंदर असते अशा रात्री जलाशयात होडीत विहार करणे जनमनास भावते.चांदण्याच्या रात्रीत  नभाकडे पाहत बसण्यात किती वेळ गेला उमजत नाही.  अशा रम्य रात्री सहजच मनी   सुचले
       अशा रम्य चांदराती
       प्रेमी युगुल रमले
      भाव हळुच मनीचे
      मुग्धपणे उमजले

आणि या चांदण्यात विहरताना सहज जलाशयाकडे लक्ष जाता शनीचे रूप खुणावत होते. मनास लोभवित होते.व माझे मन त्या क्षणी मला काही सांगत होते. पटकन झरणी माझी झरु लागली.व ती वदली
        रूप मोहक चंद्राचे
        नभी दिसते सोनेरी
        प्रतिबिंब ते जाते
        भासे  हसरे चंदेरी
 अशा सुंदर. कल्पना हे सारख्या सामान्याच्या मनी आल्या तर महान सारस्वतांच्या
कल्पना काय सुंदर असणार . तर या विश्वेवराची काय किमया आहे.चंद्र. तारे तारिकांची  निर्मिती केल्याने हे विलोभनीय दृश्य आपल्याला दिसते.जितकी
दुपारच्यावेळी  ग्रीष्मात असह्य गर्मी   तितकीच शीतलता अनुभवयास मिळाली.
मन त्या चचांदण प्रकाशात न्हावू निघाले
कधी चांदरात संपत आली व अलवार चांदण्याचा पसारा आवरला गेला याचे भानच नाही राहिले. 

वैशाली वर्तक
अहमदाबाद



शब्दरजनी साहित्य समूह आयोजित 
द्विपदी काव्य लेखन 
विषय...  नको चंद्र तारे 

 वाटे मौज रात्रीस, चंद्र तारे पाहण्याची
 तारिकांची हौस, शशी संगे खेळण्याची

चंद्र चांदण्यांचा चाले खेळ नभी लोभनीय
रुप खुले चंद्रासवे चांदणीचे रमणीय

रूप मोहक चंद्राचे नभी दिसते सोनेरी
प्रतिबिंबित  जलाते. भासे  हसरे चंदेरी

अशा रम्य  चांदरात्री  प्रेमी युगल रमले
भाव हळुच मनीचे मुग्धपणे उमजले

इतकं सुंदर रुप अवर्णनीय भासे  सारे
कसे येतील शब्द अधरी *नको चंद्र तारे* 

 कोणी देतं नाही ,नभीचे कधी चंद्र तारे 
 सा-या कवी कल्पनात  रमती जन सारे

  प्रकाशित आसमंती चंद्र तारे गगनात
  चांदण्याची  रात्र सारे ,घालविती आनंदात 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 



अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...