सर्व धर्म समभाव साहित्य मंच
आयोजित उपक्रम क्र ५
विषय - आशा
आशा शब्दच देतो बळ
त्याची शब्दावर चाले जग
होता न कधी निराश मानव
प्रयत्न करत जगतो मग
आशा असावी मनी सदा
जसे निशे नंतर ऊषा
करा मेहनत मिळवा यश
पहा यशाची मिळेल दिशा
होती मनी तेनसिंगला
एवरेस्ट वर ठेवण्याचे पाऊल
त्या आशेच्या बळावर
त्याला लागली यशाची चाहुल
स्वातंत्र्य प्राप्तीची आशा
होती स्वातंत्र्य वीरांची
अतोनात करिता प्रयत्न
आशा फळली स्वातंत्र्याची
उगा का म्हणती जन
आशा असे सदैव अमर
मोठ मोठे मिळवा यश
प्रयत्न करा तया बरोबर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा