अ भाम प सा ठाणे जिल्हा २
आयोजित
उपक्रम नं २६७
विषय - राजा राणी
खेळत होते पत्ते नातवाशी
पहिले राजाचे रूप रुबाबदार
आले पान हाती राणीचे
होती नाजूक पण शानदार
रमले विचारात राजा राणीच्या
मनी उठले विचार तरंग
ठेवले तेथे निज रुपाला
वाढला की मम मनी उमंग
आले हाती पान राजाचे
खुश झाले मी मनात
घेते बघा मुठीत आता
विसर पाडीन क्षणात
पत्त्यातील राजा राणी
भेटता माझ्या हातात
रमले दोघे पहात एकमेका
जणु राजाराणी प्रत्यक्षात
असा झाला वैचारिक
मना मनातील खेळ
घटका भराची गंमत
मस्त मजेत गेलाना वेळ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा